Fact : हे छायाचित्र हरियाणातील एनआरसीच्या समर्थकांच्या आंदोलनाचे नाही

False राजकीय सामाजिक

देशभरात कॅब आणि एनआरसीच्या विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुरु आहे. याबाबतची वेगवेगळी छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. हरियाणात कॅब आणि एनआरसी समर्थकांनी केलेल्या आंदोलनाचे म्हणून एक छायाचित्र समाजमाध्यमात पसरत आहे. शीतल कर्वे यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

screenshot-www.facebook.com-2019.12.20-16_29_20.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

हे छायाचित्र हरियाणात कॅब आणि एनआरसी समर्थकांनी केलेल्या आंदोलनाचेच आहे का, याचा शोध घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी जो परिणाम मिळाला त्यात आम्हाला माय नेशन या संकेतस्थळावरील 10 मे 2019 चे एक छायाचित्र दिसून आले. हेच तेच छायाचित्र आहे जे सध्या समाजमाध्यमात nrc समर्थकांच्या आंदोलनाचे छायाचित्र म्हणून पसरत आहे. गुरुदासपूर येथून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविताना सनी देओल यांनी काढलेल्या रॅलीचे हे छायाचित्र आहे. 

screenshot-hindi.mynation.com-2019.12.20-17_10_26.png

संकेतस्थळावरील मुळ वृत्त आणि छायाचित्र / Archive

युटूयूबवरही आम्हाला इंडियन टीव्ही या चॅनलचा 27 एप्रिल 2019 रोजीचा एक व्हिडिओ आढळला. या व्हिडिओतही आपण 49 ते 59 व्या सेकंदापर्यंत हे दृश्य पाहू शकता. सनी देओल यांनी बारमेर लोकसभा मतदारसंघात काढलेल्या रॅलीतील हे दृश्य असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

Archive 

ट्विटरवही हे छायाचित्र बारमेर येथील असल्याचा दावा अनेक जणांनी केला असल्याचे दिसून येते. 

Archive

या रॅलीचे द इकोनॉमिक्स टाईम्सने 27 एप्रिल 2019 रोजी वृत्तही दिले आहे. या संशोधनातून हे स्पष्ट होत आहे की हे द्दश्य एनआरसी समर्थकांच्या आंदोलनाचे नसून निवडणूकीच्या रॅलीचे आहे. 

निष्कर्ष 

हे छायाचित्र हरियाणातील एनआरसी समर्थकांच्या आंदोलनाचे नसून सनी देओल यांच्या निवडणूकीच्या रॅलीचे आहे. ते चुकीच्या माहितीसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact : हे छायाचित्र हरियाणातील एनआरसीच्या समर्थकांच्या आंदोलनाचे नाही

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False