केरळमधील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

केरळमधील गर्भवती हत्तीणीला अमानुषपणे मारण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये सध्या या हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे म्हणून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र केरळमधील घटनेतील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Sandip Naik FB Post.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

केरळमधील हत्तीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का, हे जाणून घेण्यासाठी हे छायाचित्र नीट पाहिले. त्यावेळी या हत्तीच्या पायावर तरलाबलू असा कन्नड शब्द लिहिला असल्याचे दिसून आले. या कन्नड शब्दाच्या आधारे शोध घेतल्यावर 12 नोव्हेंबर 2015 रोजी “तरलाबलू जगद्गुरु ब्रिहन्माथ” नावाच्या एका फेसबुक पेजवर हे छायाचित्र अपलोड करण्यात आले असल्याचे दिसून आले.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

त्यानंतर याबाबत आणखी काही माहिती मिळते का, याचा शोध घेतला. त्यावेळी वन इंडिया या संकेतस्थळाने 13 नोव्हेंबर 2015 रोजी याबाबत दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार गौरी ही श्री तरालबालु जगद्गुरु मठातील एक हत्तीण होती. या हत्तीणींचा नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला मृत्यू झाला. या हत्तीणींने टी. एस. नागभरण यांनी दिग्दर्शित केलेल्या कल्लारी फूल या चित्रपटातही भूमिका निभावली होती.

image2.png

संग्रहित

निष्कर्ष

केरळमधील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र असल्याचा दावा असत्य आहे. हे छायाचित्र कर्नाटकमधील पाच वर्षापुर्वी झालेल्या एका हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे आहे.

Avatar

Title:केरळमधील हत्तीणीच्या अंत्यसंस्काराचे हे छायाचित्र आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply