Fact : स्थलांतरितांचे हे छायाचित्र नेमक्या कोणत्या देशातील?

False राजकीय | Political सामाजिक

अति मानवाधिकार कसा अंगलट येतो पहा संपन्न युरोपची काय अवस्था करून टाकलीय ह्यांनी. #support #nrc अशी माहिती Yogesh Mahadev Shevkari यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. हे छायाचित्र नेमके कुठले आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

मूळ फेसबुक पोस्ट / Archive

हे छायाचित्र ISIS च्या भितीने स्थलांतर करणारे सिरीयातील लोक म्हणून 2015 पासून शेअर होत असल्याचे दिसून येते.  

मूळ फेसबुक पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

हे छायाचित्र नेमके ISIS च्या भितीने स्थलांतर करणारे सिरीयातील लोकांचे हा का याचा शोध घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात हे छायाचित्र दुसऱ्या महायुध्दादरम्यान आफ्रिकेत आश्रय घेणाऱ्या युरोपीय नागरिकांचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मूळ वृत्त / Archive

हे छायाचित्र ISIS च्या भितीने स्थलांतर करणाऱ्या सिरीयातील लोकांचे नसल्याचे या वृत्तात म्हटले असले तरी आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला न्यूज डॉट कॉम या संकेतस्थळावर या जहाजाचे छायाचित्र दिसून आले.

न्यूज डॉट कॉम / Archive 

बीबीसीच्या संकेतस्थळावरील खालील लेख दिसून आला. या लेखात या छायाचित्राविषयी वेगवेगळे दावे करण्यात येत असले तरी हे छायाचित्र 1991 मध्ये “वोलोरा’ या जहाजावरून इटलीत पळून गेलेले हे अल्बेनियन्स असल्याचे म्हटले आहे. लेखात या छायाचित्रावरुन बराच उहापोह करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाईम्सनेही या स्थलांतराबाबतचे वृत्त 7 मार्च 1991 रोजी दिल्याचे दिसून येते.

न्यूयॉर्क टाईम्सचे मूळ वृत्त / Archive

फ्रान्स 24 या संकेतस्थळानेही हे छायाचित्र वेगवेगळ्या खोट्या दाव्यासह जगभर फिरत असल्याचे म्हटले आहे. स्नूप आणि आफ्रिका चेक यांनीही या छायाचित्राचे फॅक्ट चेक केलेले आहे. 

निष्कर्ष 

सिरीयातील ISIS च्या भितीने स्थलांतर करणाऱ्या नागरिकांचे हे छायाचित्र नाही. हे छायाचित्र 1991 मध्ये “वोलोरा’ या जहाजावरून इटलीत जात असलेल्या अल्बेनियन्स नागरिकांचे आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा असत्य असल्याचे आढळले आहे.

Avatar

Title:Fact : स्थलांतरितांचे हे छायाचित्र नेमक्या कोणत्या देशातील?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False