‘ऑपरेशन मुछ्छड’ नावाचे खरोखरच काही घडले होते का? : सत्य पडताळणी

False Headline आंतरराष्ट्रीय राजकीय

राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अजित डोवाल यांनी अंडरवल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी 2005 मध्ये ऑपरेशन मुछ्छड आखले होते, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. पण हे ऑपरेशन करताना अजित डोवाल यांना आणि त्यांच्या साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली, असे म्हटले जाते. बोल भिडू या फेसबुकपेजवर या संदर्भातील पोस्ट आहे. या वृत्ताची केलेली ही तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रिसेंडो टीमने पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 56 वेळा शेअर झाली होती. या पोस्टवर 996 लाईक्स आणि 15 कमेंटस् आहेत. तसेच ही पोस्ट फेसबुक पेजवर मराठी सिने तडका या फेसबुक पेजवरही आहे.  

फेसबुक

अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात जेव्हा गुगलवर What is operation  Muchhad ? असे सर्च केले असता खालील माहिती समोर आली.

युट्युबवर सतपल सागर या चॅनलवर या विषयाचा एक व्हिडिओ 20 एप्रिल 2013 ला अपलोड करण्यात आलाय. स्टार न्युजचा हा व्हिडिओ ऑपरेशन मुछ्छड (स्टार न्युज सनसनी) या नावाने अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये 00.10 सेकंदापासून 00.12 सेकंद या व्हिडीओमध्ये 1997 ते 1998 या कार्यकाळात छोटा राजन यांच्या सांगण्यानुसार, त्याच्याच माणसांच्या टीमने दाऊदला मारण्याचा प्लॅन केला होता असे म्हटले आहे. परंतू व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये ऑपरेशन मुछ्छड हे 2005 या काळात झाले आहे असा उल्लेख आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दिलेला ऑपरेशन मुछ्छड याबद्दल कोणतेही साधर्म्य नाही.

सौजन्य – बोल भिडू

तसेच या व्हिडिओत 4.33 मिनीटापासून ते 4.50 मिनीटापर्यंत दाऊद यांची मुलगी मारिया हिच्या मृत्युच्या 40 दिवसानंतर असा उल्लेख केला आहे. त्यानुसार दाऊद इब्राहिमचे फॅमिली बॅगराउंड चेक केल्यावर असे आढळून आले की, दाऊद याच्या या नावाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. परंतू त्याबद्दलची तारीख आणि वर्ष कळू शकले नाही.

India Today l  अर्काईव्ह

अर्काईव्ह

याशिवाय युट्युबच्याच एबीपी संझा या चॅनलवर ऑपरेशन दाऊद नावाचा व्हिडिओ 13 मार्च 2018 ला अपलोड करण्यात आला. या व्हिडिओतही 1998 मध्ये 01.08 ते 01.13 सेकंदा दरम्यान ऑपरेशन दाऊद करण्यात आले आहे असे म्हटले आहे. परंतू ह्या व्हिडिओतही 2005 या काळाचा कोणताही संदर्भ आणि अजित डोवाल यांचा काही उल्लेख दिलेला नाही.

अर्काईव्ह

‘ऑपरेशन मुछ्छड’ या विषयी अधिक माहिती घेताना, काही वृत्तपत्रांमध्ये ऑपरेशन दाऊद आणि अजित डोवाल या संदर्भातील बातमी प्रसिद्ध झाली आहे.

India Today l अर्काईव्ह  

इंडिया टुडेच्या राहुल कवल यांच्याशी झालेल्या विशेष मुलाखतीत माजी गृहसचिव आणि भाजप नेते आर. के. सिंग यांनी  दाऊद ऑपरेशन याबद्दल खुलासा केला आहे.

खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

India Today l अर्काईव्ह  

इंडिया टुडेअर्काईव्ह

संपुर्ण तथ्यांची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, माजी गृहसचिव आणि भाजप नेते आर. के. सिंग यांनी ऑपरेशन दाऊद याविषयी आणि मुंबई पोलिसांबद्दल सविस्तर सांगितले आहे. या वृत्तामध्ये सिंग यांनी कोणत्याही कालखंडाचा उल्लेख केलेला ऩाही. तसेच आपण जी माहिती सांगत आहोत ती ऐकीव असून, त्याबद्दलचा स्पष्ट पुरावा माझ्याकडे नाही असेही प्रसारमाध्यमांना सांगितले.

आजपर्यंत दाऊद याला पकडण्यासाठी भारताकडून सात वेळा प्रयत्न झाले आहेत. परंतू या सात प्रयत्नात कुठेही ऑपरेशन मुछ्छड असा उल्लेख आलेला नाही. यासंदर्भात Ocean’s 8  येथे सविस्तर वृत्त वाचू शकतात. या वृत्तामध्ये 2005 साली दाऊद याला पकडण्याचा भारताकडून एक प्रयत्न झाला असे स्पष्ट केले आहे. परंतू त्या ऑपरेशनचे नाव मुछ्छड ऑपरेशन नाही.

अर्काईव्ह

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी 2013 साली सुपर बॉईज या नावाने एक ऑपरेशन झाल्याचे वृत्त इंडिया टी व्हीने प्रसिद्ध केले आहे.

अर्काईव्ह

या वृत्तात कुठेही ऑपरेशन मुछ्छड नाव प्रसिद्ध केलेले नाही.

निष्कर्ष:  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ऑपरेशन मुछ्छड खरेच होते का? ते खरेच हाती घेण्यात आले होते का, हे पुरेसे स्पष्ट होत नाही. 2005 साली दाऊदला पकडण्यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात आला असावा, असे म्हटले जाते. या ऑपरेशनचे नाव मुछ्छड होते का? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने या वृत्ताचे शीर्षक चुकीचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Avatar

Title:‘ऑपरेशन मुछ्छड’ नावाचे खरोखरच काही घडले होते का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False Headline