जामावाद्वारे छेडछाड झालेल्या महिलांचा व्हिडिओ नेमका कुठला ? वाचा सत्य

Missing Context Social राजकीय

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जामावाद्वारे 3 महिलांचा भर रस्त्यावर छळ केला जात आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. अनके युजर्सने या व्हिडिओला हिंदु-मुस्लिम रंग देऊन सांप्रदायिक दावेसुद्धा केले आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतातील नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये जमावाकडून 3 महिलांचा छळ केला जातो.

व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “हिंदू मुलींनो तुम्ही 2 असो 4 असो वा 10 असो. कधीही हिम्मत करून मुस्लिम एरियात, त्यांच्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. कारण अश्या ठिकाणाहूनच आपल्या हिंदू मुली जास्त करुन गायब होतात. ही घटना ही नकळत मोबाईल मध्ये शूट झाली. तेव्हा समजलं की, अस काय होत ते. बिचाऱ्या त्या आपल्या ताई ची या 100 ते 500 जिहादींच्या गर्दीचा फायदा घेऊन धक्काबुक्की करुन आत घेऊन जाऊन. या नराधमांनी काय केल असेल. ते मी सांगायला नको. कृपया आपल्या माय भगिनींना यापासून वाचवा. जागरूक आणि सतर्क करा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हडर्सच्या आधारे सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानातील आहे.

Almost FedUP या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ 18 ऑगस्ट 2021 रोजी अपलोड केलेला होता. सोबत माहिती दिली होती की, “14 ऑगस्ट 2021 रोजी पाकीस्तान स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान जवळ महिलांची छेड काढण्यात आली होती.” या घटनेचे इतर व्हिडिओ आपण येथेयेथे पाहू शकतात.

सदरील माहितीच्या आधारे गुगल मॅपवर सर्च केल्यावर लाहोरमधील आझाद चौक मेट्रो स्टेशन जवळ ग्रेटर इकबाल पार्कमध्ये मिनार-ए-पाकिस्तान हे ठिकाण आढळले.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, युट्यूब व्हिडिओमधील दाखवलेली मिनार आणि मॅपमध्ये दिसणारी मिनार-ए-पाकिस्तान एकच आहे.

तसेच युट्यूबवरील व्हिडिओमध्ये उजव्या बाजूला एक मस्जिद दिसते.

गुगल मॅपवर सर्च केल्यावर ती बादशाही मस्जिद असल्याचे स्पष्ट झाले.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, युट्यूब व्हिडिओमधील दाखलेली मस्जिद आणि मॅपमध्ये दिसणारी बादशाही मस्जिद एकच आहे.

नेमकी घटना काय ?

सदरील माहितीच्या आधारे कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान जवळ ग्रेटर इकबाल पार्कमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते.

तेव्हा पाकिस्तानची टिकटॉकर आएशा अक्रमदेखील तेथे उपस्थित होती. लोकांनी तिचासोबत फोटो आणि व्हिडिओ काढले. थोड्या वेळाने तेथील गर्दी अनावर झाल्याने आएशा यांची छेडछाड काढण्यात आली.

आएशा अकरम यांनी लाहोरच्या नारी अड्डा ठण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांनी एफआयआरमध्ये सांगितले की, “300 ते 400 लोकांनी मला आणि माझ्या मित्रांना घेरले होते. मला हवेत उच्चल आणि माझे कपडे फाडले.”

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. याच प्रमाणेच त्या दिवशी अनेक ठिकाणी छेडछाड झाल्याचे समोर आले होते.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, जामावाद्वारे महिलांची भर रस्त्यात छेड काढल्याचा व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी लाहोरमधील ग्रेटर इकबाल पार्कमध्ये ही घटना घडली होती.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जामावाद्वारे छेडछाड झालेल्या महिलांचा व्हिडिओ नेमका कुठला ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Missing Context