
नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे नुकतेच भारतात दौऱ्यावर असताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले होते.
या पार्श्वभूमीवर अस्ले तोजे यांनी पंधप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्कारसाठी मोठे दावेदार आहेत, असे म्हटल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी अशा पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, अस्ले तोजींनी असे कोणतेही विधान केले नसून चुकीचा दावा व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, “नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे म्हटले नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्कारासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे नरेंद्र मोदी नोबेल पुरस्कारासाठी दावेदार आहे, असे म्हटलेच नव्हते.
एएनआयला मुलाखत देताना अस्ले तोजे यांनी सांगितले की, अनेक देशांप्रमाणे भारतानेदेखील रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी नोबेल पुरस्कार समितीने भारताचे कौतुक केले.
पुढे अस्ले म्हणतात की, नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांना युद्ध आणि अण्वस्त्रे वापरण्याच्या परिणामांबद्दल कडक संदेश देत “हे युद्धांचे युग नाही” असे सुनावले. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या नेत्यांची खूप गरज आहे. तसेच “मी नॉर्वेजियन नोबेल समितीचा उपनेता म्हणून भारतात आलेलो नाही, तर मी येथे आंतरराष्ट्रीय शांतता संचालक आणि भारताचा मित्र म्हणून आहे.”
सदरील मुलाखतमध्ये कुठे ही पंतप्रधान नेरेंद्र मोदी नोबेल पुरस्कारासाठी दावेदार आहे. असे अस्ले तोजेंनी म्हटलेले नाही.
तोजे यांच्या नावाने मोदी नोबेल पारितोषिकाचे दावेदार असल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर तोजे यांनी स्वतः या बातम्यांचे खंडन केले. त्यांनी अशा पोस्टला फेक म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, “माझ्या नावाने फेक विधान व्हायरल होत आहे. त्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. नोबेल पारितोषिकाच्या दावेदाराविषयी मी कोणत्याही नेत्याच्या नावाने विधान केलेले नाही.”
एपीपी न्युजने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तोजे यांना पंतप्रधान मोदी नोबेल पुरस्कार जिंकतील का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, “केवळ नरेंद्र मोदीच नाही तर प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे नरेंद्र मोदी नोबेल पुरस्कारासाठी दावेदार आहे, असे म्हटलेच नव्हते. चुकीच्या दाव्यासह पोस्ट व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेलसाठी दावेदार असे अस्ले तोजे म्हणाले नव्हते, खोटी बातमी व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: False
