Fact Check : ममता म्हणाल्या का, मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेल

False राजकीय | Political

मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेल, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेल, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते का याचा शोध घेण्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी यांनी काय वक्तव्ये केली आहेत हे शोधले. त्यावेळी आम्हाला ममतांनी मोदींविरोधात केलेले एक भाषण दिसून आले. त्यात त्यांनी मोदींना पश्चिम बंगाल समजला नसल्याचे म्हटले आहे. आपण हा झी न्यूजचा हा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

ममता बॅनर्जींनी खरंच आत्महत्येबद्दल काही म्हटलंय का याचा शोध आम्ही पुढे नेला त्यावेळी आम्हाला एनडीटीव्हीचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात एका माजी पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येसाठी ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. हे वृत्त आपण खालील व्हिडिओत पाहू शकता.

दैनिक लोकसत्ताने 8 एप्रिल 2019 रोजी दिलेल्या वृत्तात ममता बॅनर्जी यांनी खोटारडया मोदींचे तोंड सर्जिकल टेपने बंद करा, असे म्हटल्याचे दिसून येते. या वृत्तातही त्यांनी कुठेही मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेल, असे वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही.

अक्राईव्ह

निष्कर्ष

ममता बॅनर्जी यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली असल्याचे दिसून येते. ममता बॅनर्जी यांनी कधीही मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेल, असे वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : ममता म्हणाल्या का, मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेल

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False