Fact Check : शिक्षणाचं बजेट 2900 कोटीहून 400 कोटी करण्यात आलंय का?

False राजकीय | Political

(फोटो सौजन्य : लिव मिंट)

2009 मध्ये शिक्षणाचं बजेट 2900 करोड होत आज 2019 मध्ये ते फक्त 400 करोड आहे, असा दावा करणारी पोस्ट Rahul Singh यांनी “बेधडक-आवाज महाराष्ट्राचा” या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी  

सरकारने शिक्षणावरील खर्च खरंच कमी केला आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही 2009 मध्ये शिक्षणावर नेमका किती खर्च करण्यात येत होता, याचा शोध घेतला. यात आम्हाला शिक्षण क्षेत्रासाठी 2009-10 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीविषयी बेब दुनिया या संकेतस्थळावरील खालील माहिती दिसून आली. 

बेब दुनिया / Archive 

शिक्षण क्षेत्रावर 2009-10 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीविषयी  digitallearning.eletsonline.com या संकेतस्थळावरील खालील माहिती दिसून आली. या वृत्तातील आकडेवारी नीट तपासल्यास यातील उच्च शिक्षणाचाच आकडा 2900 कोटीपेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 15 हजार 429 कोटी रुपये असल्याचे दिसून येते. 

digitallearning.eletsonline.com / Archive

त्यानंतर आम्ही 2019 या सालासाठी केंद्र सरकारने काय तरतुद केली आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला दैनिक लोकमतचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार उच्च शिक्षणासाठी 38 हजार 317 कोटींची तरतूद केल्याचे दिसून येते. 

लोकमत / Archive

लिव मिंट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने 2019 च्या अर्थसंकल्पात शिक्षणक्षेत्रासाठी 94 हजार 853 कोटी रुपयाची तरतुद केली आहे. ही तरतुद 2018-19 या वर्षापेक्षा दहा हजार कोटीने अधिक आहे.  

हे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा : लिव मिंट / Archive

द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने 2019 च्या अर्थसंकल्पात शिक्षणक्षेत्रासाठी 94 हजार 853 कोटी रुपयाची तरतुद केली आहे.

यातील 400 कोटी रुपये हे जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थाच्या स्थापनेसाठी आहेत. 

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थाच्या स्थापनेबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमन या काय म्हणाल्या, हे आपण खालील व्हिडिओत पाहू शकता.

आपण खालील लिंकवर संपूर्ण अर्थसंकल्प तसेच उच्च शिक्षणासाठी करण्यात आलेली तरतूद (क्रमांक 58 वर) पाहू शकता. 

उच्च शिक्षणासाठी करण्यात आलेली तरतूद 

संपूर्ण अर्थसंकल्प

निष्कर्ष

शिक्षण क्षेत्रासाठी सरकारने 2019 च्या अर्थसंकल्पात भरीव तरतुद केली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी फक्त 400 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याची माहिती असत्य आहे. 2009 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतुद ही 2900 कोटी पेक्षा अधिक असल्याचे दिसून येते त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळून आली आहे.

Avatar

Title:Fact Check : शिक्षणाचं बजेट 2900 कोटीहून 400 कोटी करण्यात आलंय का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False