नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसणारा हा व्यक्ती हाथरस घटनेतील आरोपीचे वडील नाही; वाचा सत्य

False सामाजिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्ममंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ते हाथरस प्रकरणातील आरोपी संदीपचे वडील आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली असता कळाले की, तो व्यक्ती भाजपचा नेता श्यामप्रकाश द्विवेदी असून त्याचा हाथरस घटनेशी काही संबंध नाही.

काय आहे दावा?

नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बसलेल्या एका व्यक्तीचे फोटो शेयर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, “थरस प्रकरणातील आरोपी संदीप ठाकूरचा बाप काय बोलावं यावर आता…”

Sandip Thakur Father FB Claim.png

फेसबुक पोस्ट | संग्रहित 

तथ्य पडताळणी

व्हायरल होत असलेला व्यक्ती कोण हे निश्चित करूया. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्यक्ती भाजप नेता श्यामप्रकाश द्विवेदी आहे. तो काशी येथील भाजप युवा मोर्चाचा (भाजयुमो) उपाध्यक्ष होता. त्याच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटरवर भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत त्याचे फोटो उपलब्ध आहेत. 

भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत श्यामप्रकाश द्विवेदी.

मूळ फोटो – फेसबुकअर्काइव्ह

विशेष म्हणजे श्यामप्रकाश द्विवेदी यांच्यावरदेखील एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण ते प्रकरण वेगळे आहे. प्रयागराज पोलिसांनी द्विवेदीला 3 ऑक्टोबर 2020 रोजी अटक केली असून, त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आलेली आहे. प्रयागराजच्या कर्नलगंज पुलिस स्टेशनमधील सर्किल ऑफिसर अजय दीक्षित यांनी त्याची पुष्टी केली आहे.

हे तर माहित झाले की, व्हायरल फोटोतील व्यक्तीचे नाव श्यामप्रकाश द्विवेदी आहे.

मग हे श्यामप्रकाश द्विवेदी हाथरस प्रकरणातील आरोपी संदीपचे वडिल आहेत का?

हाथरस प्रकरणातील आरोपींची नावे संदीप, रामू, लवकुश, रवी अशी आहेत. पैकी संदीपचे हे वडिल असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत खरी माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने हाथरसचे पोलीस अक्षीक्षक विनीत जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितले की, “हाथरस प्रकरणातील सगळे आरोपी हे गावातीलच रहिवासी आहेत. आरोपींमधील कोणाच्याही वडिलांचे नाव श्यामप्रकाश द्विवेदी नाही. तसेच चौघांपैकी कोणताही आरोपी भाजप नेत्याचा मुलगा नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती पूर्णतः असत्य आहे.”

श्री. जैस्वाल यांनी हाथरस प्रकरणी दाखल एफआयआर (FIR) कॉपी फॅक्ट क्रेसेंडोला पाठवली. त्यात आपण पाहू शकता की, आरोपी संदीपच्या वडिलांचे नाव सुनील दिलेले आहे. एफआयआरमध्ये कुठेही श्यामप्रकाश द्विवेदी यांचे नाव नाही.

हाथरस प्रकरणाची FIR कॉपी.

फॅक्ट क्रेसेंडोने श्यामप्रकाश द्विवेदी यांचे वडील रामरक्षा यांच्याशीसुद्धा संपर्क साधला. “माझा मुलगा श्यामप्रकाशला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी 14 वर्षांची तर लहान मुलगा सहा वर्षांचा आहे. आमच्या घरातील कोणाचाही हाथरस प्रकरणाशी संबंध नाही,” असे त्यांनी सांगितले.

यावरून स्पष्ट झाले की, व्हायरल फोटोतील व्यक्ती श्यामप्रकाश द्विवेदी आरोपी संदीपचे वडील नाहीत. मग त्याचे वडील कोण आहेत?

आरोपी संदीपचे वडील

न्यूज 24 युपी-उत्तराखंड या वृत्तवाहिनीने हाथरस प्रकरणातील चारही आरोपींच्या कुटुंबियांची मुलाखत घेतली होती. यामध्ये आरोपी संदीपच्या वडिलांचाही समावेश आहे. आपण 8:31 मिनिटांपासून त्यांना पाहू शकता.

निष्कर्ष 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो काशी येथील भाजप नेते श्यामप्रकाश द्विवेदी यांचे आहेत. हाथरस प्रकरणातील आरोपी संदीपचे ते वडील नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्ट असत्य आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने गोळा केलेल्या नवीन पुराव्यांनिशी सदरील फॅक्ट-चेक UPDATE करण्यात आलेले आहे.)

Avatar

Title:नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसणारा हा व्यक्ती हाथरस घटनेतील आरोपीचे वडील नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False