
सुधीर मुनगंटीवार विधानसभा क्षेत्र दुर्गापूर.. लाल कलर टवेरा evm घेऊन फरार.. मूल वरून आणल्या evm मशीन, कार मध्ये सापडल्या 3 evm मशीन.. दुर्गापूरमधे तणाव अशी माहिती Nimish Motghare यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
दुर्गापूर येथे EVM पळवून नेण्याची घटना घडली आहे का? याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला दैनिक सकाळचे 21 ऑक्टोबर 2019 रोजीचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात बल्लारपूर मतदारसंघातील केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनाला काही लोकांनी अडवल्यानंतर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे, असे म्हटले आहे.
याबाबत निवडणूक आयोगाने अथवा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काही स्पष्टीकरण दिले आहे का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही. युटयूबवर मात्र आम्हाला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिलेले स्पष्टीकरण दिसून आले. ते आपण खाली पाहू शकता.
विभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनात राखीव EVM दिसल्यानंतर नागरिकांचा गैरसमज झाल्याचे यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या ठिकाणी गेले आणि त्यांनी या मशीन्स बसमधून बल्लारपूरला रवाना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनातील मशीन सुरक्षित आहेत. मशीनचे क्रमांक उमेदवारांना देण्यात आले आहेत. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
निष्कर्ष
बल्लारपूर मतदारसंघातील दुर्गापूर मतदान केंद्रातील EVM पळविण्यात आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. मशीन नेणाऱ्या या व्यक्ती निवडणूक आयोगाशी संबंधित होत्या. नागरिकांचा याबाबत गैरसमज झाला होता. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact : दुर्गापूर येथे EVM पळवून नेण्याची घटना केवळ अफवा
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
