Fact Check : बाबा रामदेव गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी परदेशात रवाना?

False राजकीय

बाबा रामदेव गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी परदेशात रवाना झाल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

बाबा रामदेव गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी परदेशात रवाना झाले आहेत का ? याची आम्ही शोध घेतला. त्यावेळी बाबा रामदेव ते उपचारासाठी परदेशात रवाना झाले असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. बाबा रामदेव यांच्या आरोग्याबाबतच्या या बातम्या मग का निर्माण झाल्या असाव्यात असा प्रश्न त्यामुळे आम्हाला पडला. त्यावेळी आम्हाला बाबा रामदेव यांच्याबाबतचे द हिंद बिझनेस लाईनचे खालील वृत्त दिसून आले.

ARCHIVE HINDU

त्यानंतर आम्हाला द नॅशनल या वृत्तपत्राचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार श्री श्री रविशंकर आणि मोरारी बापू यांच्या हाताने फळांचा रस घेऊन बाबा रामदेव यांनी आपले उपोषण सोडले.

ARCHIVE NATIONAL

एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीनेही याबाबत बाबा रामदेव यांचे प्रवक्ते एस. के. तिजोरीवाला यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनीही या वृत्ताचा इन्कार केला.

ARCHIVE

निष्कर्ष

योगगुरु बाबा रामदेव हे गुडघ्याच्या उपचारासाठी परदेशात रवाना झाले आहेत. याचा कोणताही पुरावा आढळून येत नाही. बाबा रामदेव यांचे प्रवक्ते एस. के. तिजोरीवाला यांनीही याचा इन्कार केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत याबाबतची पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : बाबा रामदेव गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी परदेशात रवाना?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False