अंबालातील छेडछाडीच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत दावा करण्यात आला आहे की, अंबाला शहरातील जैन बाजारात मुल्लाने एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलांना त्याला पकडून नग्नावस्थेत फिरवले. असे निद्य कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. रेश्मा प्रमोद नंदागोळी, शिशिर उजगावकर आणि समीर कौशिक यांनी अशा माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.   

Archive

तथ्य पडताळणी

अंबालात अशा स्वरुपाची घटना घडली का याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला त्यात 20 जानेवारी 2020 रोजी द टाईम्स ऑफ इंडिया इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळाने दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तात एका अल्पवयीन मुलीच्या छेड काढल्याप्रकरणी या व्यक्तीला मुलीच्या नातलगांनी नग्न करत मारहाण केल्याचे म्हटले आहे. पवन उर्फ सोनू असे या आरोपीचे नाव आहे. त्याला तीन अल्पवयीन मुली आणि स्थानिक नागरिकांनीही मारहाण केली. 

image3.png

द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेले सविस्तर वृत्त / Archive 

दैनिक भास्करने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 20 जानेवारी 2020 रोजी अंबाला येथे घडली होती. महिलांनी पवन नावाच्या या युवकाला नग्न करत मारहाण केली. तो शाळेत जाणाऱ्या मुलीची छेड काढायचा आणि त्यांच्याकडे पाहून अश्लील चाळे करायचा. त्याच्या या कृत्यामुळे एका मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला होता. महिलांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि त्याला मारहाण केली.

image2.png

दैनिक भास्करने दिलेले सविस्तर वृत्त / Archive 

या घटनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही अंबाला महिला पोलीस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबल जसप्रीत यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्या म्हणाल्या, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप नाही आणि मुस्लीम देखील नाही. पॉस्कोच्या कलम 12 आणि आयपीसीच्या 506 नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीवर तीन मुलींनी छेडछाडीचा आणि आपल्याला पाहून अश्लील चाळे करत असल्याचा आरोप केलेला आहे. यातील एका मुलींने शाळेत जाणे बंद केल्यावर मुलीच्या आईने पाठलाग करुन आरोपीला पकडले आणि त्याला नग्न करुन मारहाण केली.

निष्कर्ष

आरोपीने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला नाही. तो मुस्लीम असल्याचेही असत्य आहे. या घटनेला धार्मिक रंग देत असत्य माहिती पसरवली जात आहे.

Avatar

Title:अंबालातील छेडछाडीच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •