कोरोना तपासणीस सहकार्य न करणारी ही महिला पाकिस्तानमधील; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोना तपासणीसाठी वैदयकीय कर्मचारी आणि पोलिसांना सहकार्य न करणाऱ्या महिलेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. कोरोना तपासणीस सहयोग करणारा मुस्लीम समाज, आता तर त्यात मुस्लीम महिलाही आघाडीवर आहेत, अशा माहितीसह पसरत असलेला हा व्हिडिओ भारतातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

कोरोना तपासणीसाठी वैदयकीय कर्मचारी आणि पोलिसांना सहकार्य न करणाऱ्या महिलेचा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे जाणून घेण्यासाठी यातील एक दृश्य घेत ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी WorldProtv या फेसबुक पेजवर 31 मार्च 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला हाच व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत ही घटना पाकिस्तानमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या महिलेने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या गैरवर्तनाची असल्याचे म्हटले आहे. 

Archive 

त्यानंतर Developing Pakistan या ट्विटर खात्यावरील 29 मार्च 2020 रोजीचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये ही पाकिस्तानमधील सुक्कुर येथील घटना असल्याचे म्हटले आहे. या महिलेची कोरोनाची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आल्यावर तिने हा गोंधळ घातल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Archive

त्यानंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे प्रवक्ते मुर्तझा वहाब यांचे 18 मार्च 2020 रोजीचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये त्यांनी तफतान सीमेवरुन पाकिस्तानात येणाऱ्या यात्रेकरुंसाठी ही विलगीकरणाची सुविधा उभारण्यात आल्याचे म्हटले आहे.

Archive

समाजमाध्यमात भारतीय मुस्लीम महिलांचा म्हणून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील आणि सिंध सरकारच्या व्हिडिओतील इमारती एकच असल्याचे आपण खाली केलेल्या तुलनेतही स्पष्ट पाहू शकता.

2020-04-28.jpg

यातून हे स्पष्ट होत आहे की, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असहकार्य करणारी ही महिला भारतीय मुस्लीम असल्याचे असत्य आहे. पाकिस्तानमधील हा व्हिडिओ असत्य माहितीसह भारतात पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष 

आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असहकार्य करणारी ही महिला भारतीय मुस्लीम असल्याचे असत्य आहे. ही महिला पाकिस्तानी असून व्हिडिओ देखील पाकिस्तानमधील आहे.

Avatar

Title:कोरोना तपासणीस सहकार्य न करणारी ही महिला पाकिस्तानमधील; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False