Fact Check : मुंबईत माशांचा पाऊस पडला का?

False सामाजिक

मुंबईच्या समुद्रातून माशांचा पाऊस पडला अशी
India Culture And Art Savita S Gholap यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी

या पोस्टच्या व्हिडिओत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मुंबईतील असल्याची शक्यता दिसते. त्यामुळे मुंबईत माशांचा पाऊस पडलाय का याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. 

या परिणामात आम्हाला दिसून आले की मुंबईत माशांचा पाऊस पडल्याचा दावा करण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन न्यूज 18 लोकमतने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यावेळी नागरिकांनी असा कुठेही पाऊस पडला नसल्याचे सांगितले. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

त्यानंतर आम्हाला बीबीसी मराठीचे 5 सप्टेंबर 2018 रोजी देण्यात आलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार तलावात माशांची पैदास वाढवण्यासाठी अमेरिकेतल्या बोल्डर पर्वतावरील तळ्यात एक प्रयोग करण्यात आला. यात हजारो मासे विमानातून सोडण्यात आले. या व्हिडिओत मात्र आम्हाला अपेक्षित दृश्य दिसुन आले नाही. त्यानंतर आम्हाला यु-टूयूबवर खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत मुंबईत माशांचा पाऊस म्हणून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दृश्य एक मिनीट दोन सेकंद ते एक मिनीट दहा सेकंद या कालावधीत दिसून आले.  बीबीसी सुपरनॅचरल सिरीजमधील हा व्हिडिओ 17 जून 2008 रोजी युटूयूबवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मूळ 1999 मधील असल्याचेही याठिकाणी म्हटले आहे. आपण हा व्हिडिओ खाली पाहू शकता. 

याच अर्थ हा व्हिडिओ मुंबईतील नसल्याचे स्पष्ट होते. मग हा व्हिडिओ कुठला आहे, असा प्रश्न पडतो. त्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे या व्हिडिओ शोधला पण आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. फिश रेन असे युटूयूबवर टाकले असता धमेंद्र मिश्रा यांनी एका अपघाताच व्हिडिओ टाकल्याचे दिसून येते. यात या ट्रकचा क्रमांक झारखंड राज्यातील असल्याचे दिसते.

हा व्हिडिओ दोन किंवा तीन व्हिडिओचे मिश्रण असण्याची शक्यता यामुळे दिसुन येते. 

निष्कर्ष

मुंबईत माशांचा पाऊस पडल्याचे वृत्त कोणत्याही वृतपत्राने अथवा वृत्तवाहिनीने दिलेले नाही. मुंबईतील नागरिकांनीही असे काही घडल्याचे नाकारले आहे. बीबीसीच्या एका व्हिडिओतील काही भाग आणि अन्य दोन अपघातातील भाग वापरुन हा व्हिडिओ बनविण्यात आलेला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : मुंबईत माशांचा पाऊस पडला का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False