विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर अंजना कश्यप यांनी पत्रकारांवर टीका केली का?
प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने 14 टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये आज तक (हिंदी) या चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादिका अंजना ओम कश्यप म्हणतात की, पत्रकारांनी आपल्या अनैतिक वागणुकीमुळे समाजाचे भरून न येणारे नुकसान केले आहे.
दावा केले जात आहे की, इंडिया आघाडीच्या पत्रकारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयनंतर अंजना कश्यप यांनी ही कबुली दिली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ इंडिया आघाडीच्या पत्रकारांवर बहिष्कार टाकण्याच्या आगोदरचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काल इंडिया आघाडीने 14 एन्कर गोदी मिडीयावर बंदी घातली लगेच अंजना कश्यप बाईने सूर बदलाला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) येथे आयोजित एका कार्यक्रमातील आहे.
हा कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. तसेच त्याच दिवशी अंजनांनी तिच्या ट्विटर अकाउंटवर या कार्यक्रमाचा एक फोटो शेअर केला आहे.
तसेच आयआयएमसीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, आयआयएमसीने शेअर केला फोटोमध्ये आणि व्हायरल व्हिडिओमध्ये अंजनाने परिधान केलेला पोशाख एकच आहे.
पुढे फॅक्ट क्रेसेंडोने आयआयएमसीशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ 12 सप्टेंबर रोजी आयआयएमसीमध्ये झालेल्या मुलाखत कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात अंजना ओम कश्यप यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना हा व्हिडिओ काढण्यात आला आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीने 14 सप्टेंबर रोजी काही टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात प्रतिनिधी न पाठविण्याचा निर्णय जाहीर केला होता. काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी ट्विट करून तशी माहिती दिली होती.
बहिष्कार टाकण्यात आलेल्या 14 पत्रकारांमध्ये आदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिंह, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्र त्रिपाठी, गौरव सावंत, नविका कुमार, प्राची पराशर, रुबिका लियाकत, शीव अरूर, सुधीर चौधरी आणि सुशांत सिन्हा यांच्या समावेश आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ इंडिया आघाडीच्या पत्रकारांवर बहिष्कार टाकण्याच्या आगोदरचा आहे. आयआयएमसीच्या एका कार्यक्रमादरम्यान अंजना कश्यप यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना हे विधान केले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर अंजना कश्यप यांनी पत्रकारांवर टीका केली का?
Written By: Sagar Rawate
Result: Missing Context