बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण भाजपाविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

काय आहे दावा?

बिहारमधील भाजप रॅलीचा हा व्हिडिओ आहे.

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याचा शोध घेण्यासाठी हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी या व्हिडिओत वाहनावर हरियाणा पोलीस आणि अंबाला पोलीस असे लिहिले असल्याचे दिसून आले.

Haryana BJP Rally.png

image2.png

image4.png

हा व्हिडिओ बिहारचा नसून हरियाणातील असल्याचे सांगणारे अनेक ट्विटही दिसून आले.

https://twitter.com/RobinHo0D_/status/1317411755434283008?

Archive

शेतकऱ्यांनी अंबाला येथे भाजपची रॅली रोखण्यासाठी केलेल्या या आंदोलनाचे वृत्तांकन स्थानिक प्रसारमाध्यमांनी केल्याचे दिसून येते. ट्रिब्यून इंडिया या संकेतस्थळाने याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.

image5.png

tribuneindia.com I Archive

निष्कर्ष

बिहारमधील रॅलीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. हरियाणात शेतकऱ्यांनी भाजपची रॅली रोखल्याचा हा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:बिहारच्या निवडणूक प्रचारातील भाजपाविरोधात आंदोलनाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हरियाणातील; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False