Fact Check : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 2014 पासून 2019 पर्यंत 20 कोटी जण गरीब झाले?

Mixture राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतात 2004 ते 2014 या कालावधीत 27 कोटी जण गरिबीतून बाहेर पडले. 2014 ते 2019 या कालावधीत 20 कोटी जण गरीब झाले, अशी एक पोस्ट Alhad Patil यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

संयुक्त राष्ट्रसंघाने खरंच असा काय अहवाल दिलाय का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही  UN की रिपोर्ट में दावा, भारत में 2004 से 2014 के बीच गरीबी से बाहर निकले 27 करोड़ लोग। 2014 से 2019 में 20 करोड़ लोग गरीब बने, असे टाकून गुगलवर शोध घेतला. त्यावेळी खालील परिणाम समोर आला. 

Archive

या परिणामात आम्हाला एनडीटीव्हीने 21 सप्टेंबर 2018 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2005-06 ते 2015-16 या एक दशकाच्या कालावधीत भारतात 27 कोटी जण गरिबीतून बाहेर आले. हा एक आशादायक संकेत आहे की, जगातून गरिबीचे निर्मुलन शक्य आहे. 

Archive

आपण विविध प्रसारमाध्यमांनी याबाबत दिलेले वृत्त खाली पाहू शकता. 

navodayatimes.intalktodaynews.comamarujala.com
ArchiveArchiveArchive

आम्ही इंग्रजीतही याबाबत उपलब्ध असलेल्या माहितीचा शोध घेतला. त्यावेळी खालील परिणाम समोर आला.

Archive

त्यानंतर आम्ही 2014 ते 2019 या कालावधीत भारतात 20 कोटी लोक गरीब झाले का? याचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला अशी माहिती दिसून आली नाही मात्र खालील माहिती दिसून आली. 

indiatoday.inlivemint.comthehindubusinessline.com
ArchiveArchiveArchive

या वृत्तांमधून आणि शोधातून हे दिसून येते की, 2006 ते 2016 पर्यंत 27 कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले. परंतु 2014 ते 2019 दरम्यान 20 कोटी लोक गरीब झाले होते, हे सिध्द होत नाही.

निष्कर्ष

या संशोधनातून हे सिध्द होते की, 2004 ते 2014 कालावधीत नाही, परंतु 2006 ते 2016 या कालावधीत 27 कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले. 2014 ते 2019 दरम्यान 20 कोटी लोक गरीब झाले, हे मात्र सिध्द होत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 2014 पासून 2019 पर्यंत 20 कोटी जण गरीब झाले?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •