व्हाईट हाऊसमध्ये “श्री रुद्रम् स्तोत्राचे” पठण केल्याचा दावा फेक; वाचा सत्य

False Social राजकीय | Political

अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ‘श्री रुद्रम् स्तोत्र’ पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही विदेशी लोक पूजापाठसह स्तोत्राचे पठण करताना दिसतात. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. हा कार्यक्रम व्हाईट हाऊसमध्ये करण्यात आला नव्हता.

काय आहे दावा ?

विदेशी लोक स्तोत्राचे पठण करतानाचा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये “श्री रुद्रम स्तोत्राचे पठण इतके शुद्ध उच्चारण अमेरिकन करु शकतात याची कल्पनाही करु शकत नाही ? “श्री रुद्रम स्तोत्राचे” Jefry Arhard यानी व्हाइट हाऊस मध्ये पठण केले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, गेल्या चार वर्षांपूर्वींपासून हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

स्वामी परिपूर्णानंद नामक फेसबुक पेजवरून 2018 मध्ये हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमधील माहितीनुसार, हा व्हिडिओ क्रोएशियामधील आहे. युरोपियन वेद संघटनेकडून आयोजित या कार्यक्रमामध्ये 400 पेक्षा जास्त युरोपियन लोकांनी श्री रुद्रम स्तोत्राचे पठण केले होते.

युरोपियन वेद संघटनेच्या वेबसाईटवर या कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे. हा कार्यक्रम 3 ते 4 मार्च 2018 दरम्यान क्रोएशिया देशातील झाग्रेब शहरात आयोजित करण्यात आला होता.

या रुद्रम् स्तोत्र पठणाच्या कार्यक्रमाचे फोटो त्यांच्या वेबसाईवर उपलब्ध आहेत. खालील फोटोमध्ये आपण व्हायरल व्हिडिओमधील पूजेची मांडणी पाहू शकतात.

तसेच युरोपियन वेद संघटनेचे संस्थापक वोज्को केरॅन आणि ब्रानिमीर गोनन व्हायरल व्हिडिओमध्ये रुद्रम् स्तोत्राते पठण करत होते.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील आणि फोटोमधील दोन्ही व्यक्ती एकच आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. हा रुद्रम् स्तोत्र पठणाचा कार्यक्रम व्हाईट हाऊसमध्ये झाला नव्हता. क्रोएशियामधील कार्यक्रमाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हाईट हाऊसमध्ये “श्री रुद्रम् स्तोत्राचे” पठण केल्याचा दावा फेक; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False