हे फोटो ओडिशामध्ये सध्या मदत करत असलेल्या संघाच्या स्वयंसेवकांचे नाही. ते जुनेच आहेत.

False सामाजिक

ओडिशामध्ये शुक्रवारी ‘फॅनी ’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. ताशी १७५ किलोमीटर वेगाच्या या वादळाने 29 जणांचा बळी घेतला. अनेक झोपड्या उडून गेल्या असून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, या आपत्कालिन परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक (Volunteers) येथील लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यासाठी काही फोटोदेखील शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये लिहिले की, संघाचे संस्कार हेच आहेत की आपला देश आणि समाज जर संकटात असेल तर स्वयंसेवक कोणाच्या आदेशाची प्रतीक्षा करत नाहीत! ओडिशामध्ये फणी नावाच्या तुफानामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आणायचं काम करताना स्वयंसेवक जीवाची पर्वा न करता कार्य करत आहेत !

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये दिलेल्या एक-एक फोटोला गुगल रिव्हर्स इमेज केल्यावर वेगळेच तथ्य समोर येते.

फोटो क्र. 1

गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर खालील फोटो समोर येतात. डिसेंबर 2017 साली केरळ, तामिळनाडूला ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता. अनेक मच्छिमारदेखील बेपत्ता झाले होते. तेलंगणा विश्वसंवाद केंद्राच्या वेबसाईटवर 2 डिसेंबर 2017 रोजी खाली दिलेला फोटो प्रसिद्ध झाला होता.

मूळ फोटो येथे पाहा – तेलंगणा विश्वसंवाद केंद्रअर्काइव्ह

दुसरा फोटो 17 ऑक्टोबर 2014 रोजी भारत विश्वसंवाद केंद्र वेबसाईटवर प्रसिद्ध झाला होता. आंध्रपदेश आणि ओडिशामध्ये हुडहुड वादळाने त्यावेळी हैदोस घातला होता. सदरील फोटो विशाखापट्टनम येथे मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा आहे.

मूळ फोटो येथे पाहा – विश्वसंवाद केंद्र भारतअर्काइव्ह

फोटो क्र. 2

यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एका ट्विटर युजरने 12 ऑक्टोबर 2018 रोजी शेयर केलेले फोटो आढळले. यामध्ये लिहिले की, ओडिशामध्ये आलेल्या तितली चक्रीवादळात लोकांची मदत करताना संघाचे स्वयंसेवक. म्हणजे हा फोटो यावर्षीचा नाही.

अर्काइव्ह

तसेच ऑर्गनायझर या वेबसाईटवर आम्हाला खालील फोटो सापडला. यामध्ये म्हटले की, आंध्रप्रदेशामध्ये तितली वादळाने 11 ऑक्टोबर 2018 रोजी धुमाकूळ घातला. या वादळात रस्त्यावर उन्मळून पडलेल्या झाडांना बाजूला करतानाचा स्वयंसेवकाचा फोटो दिलेला आहे. म्हणजे हा फोटो फॅनी या चक्रवादळातील नाही.

मूळ फोटो येथे पाहा – ऑर्गनायझरअर्काइव्ह

निष्कर्ष

सोशल मीडियावर फिरवले जाणारे हे फोटो यंदाचे नसून 2012 ते 2018 दरम्यानच्या वेगवेगळ्या कालावधी आणि ठिकाणांवरील आहेत. त्यामुळे ओडिशामध्ये शुक्रवारी आलेल्या फॅनी चक्रवादळाच्या तडाख्यानंतर मदत करण्यासाठी आलेल्या संघाच्या स्वयंसेवकांचे हे फोटो असल्याचा दावा असत्य ठरतो.

Avatar

Title:हे फोटो ओडिशामध्ये सध्या मदत करत असलेल्या संघाच्या स्वयंसेवकांचे नाही. ते जुनेच आहेत.

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False