राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने स्पेनमध्ये भारतीयांनी मिरवणूक काढली नाही; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

अयोध्या येथे 5 ऑगस्ट 2020 रोजी नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन होणार  आहे. त्यामुळे स्पेनमध्ये भारतीय भव्य मिरवणूक काढली होती, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त भारतीयांनी काढलेल्या मिरवणूकीचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन असल्याने स्पेनमध्ये खरोखरच भारतीयांनी मिरवणूक काढली होती का, त्यावेळी असे कोणतेही वृत्त मराठी माध्यमांनी दिले असल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर हा शोध आणखी पुढे नेला. हा व्हिडिओ नीट पाहिल्यावर स्वरगंधार ढोल ताशा पथकाचा उल्लेख याठिकाणी दिसून आला. स्वरगंधारने 16 ऑक्टोबर 2018 रोजी हा व्हिडिओ युटुयूबवर अपलोड केला असल्याचेही दिसून आले. 

संग्रहित

स्वरगंधारने 12 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या स्पेन दौऱ्याची माहिती देणारा एक व्हिडिओ देखील युटूयूबवर अपलोड केला असल्याचे दिसून आले. दैनिक सामनाने या दौऱ्याबाबत दिलेले वृत्तही दिसून आले. त्यानंतर याबाबत स्वरगंधार ढोल ताशा पथकाचे प्रसाद पिंपळे यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ जून 2018 मधील असून आम्ही त्यावेळी स्पेनच्या दौऱ्यावर गेलो होतो. हा रस्त्यावर त्यावेळी काढण्यात आलेल्या एका मिरवणूकीचा व्हिडिओ आहे. हा तीन दिवसांचा दौरा होता. तेथील सरकारने तो आयोजित केला होता. भारताव्यतिरिक्त अन्य देशातील कलापथके त्यावेळी तिथे आपली कला सादर करण्यासाठी आली होती. या व्हिडिओतील मिरवणूकीचा राम मंदिराच्या भूमिपूजनाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ चुकीच्या माहितीसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष

स्वरगंधार ढोल ताशा पथकाने 2018 मध्ये आपली कला सादर करण्यासाठी स्पेनमध्ये काढलेल्या मिरवणूकीचा हा व्हिडिओ आहे. ही मिरवणूक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काढण्यात आल्याचे असत्य असल्याचे स्वरगंधार ढोल ताशा पथकाने स्पष्ट केले आहे.

Avatar

Title:राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने स्पेनमध्ये भारतीयांनी मिरवणूक काढली नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False