पुराच्या पाण्याबरोबर घरात मासे आल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

False सामाजिक

हैदराबाद शहरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर पुराचे अनेक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाले आहेत. पुराच्या पाण्याबरोबर घरात मासे आल्याचा असाच एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ हैदराबादमध्ये नुकत्याच आल्याचा पुराचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

काय आहे दावा

हैदराबाद शहरात नुकत्याच आलेल्या पुराच्या पाण्यासोबत घरात मासे आल्याचा हा व्हिडिओ आहे.

Facebook Post | Archive

तथ्य पडताळणी

हैदराबाद शहरात पुराच्या पाण्यासोबत घरात मासे आल्याचा हा व्हिडिओ आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर शोध घेतल्यावर तेलगु अलर्ट या स्थानिक वाहिनीने 22 ऑगस्ट 2020 रोजी युटूयूबवर अपलोड केलेला व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीत ही घटना वारंगल येथील असल्याचे म्हटले आहे. 

Archive

तेलगू 99 न्यूज या वाहिनीने युटूयूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओखाली दिलेल्या माहितीनुसार वारंगलमधील वड्डेपल्ली या गावात घडलेली ही घटना आहे. 

Archive  

वड्डेपल्ली गावात ऑगस्ट 2020 मध्ये आलेल्या पुराचे अनेक व्हिडिओदेखील दिसून आले. वारंगल जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त 17 ऑगस्ट 2020 रोजी द टाईम्स ऑफ इंडियाने (Archive) दिले आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील आणि पाकिस्तानमधील कराची शहरातील असल्याचा दावाही काहींनी केला आहे. 

निष्कर्ष   

हैदराबाद शहरात नुकत्याच आलेल्या पुराच्या पाण्यासोबत घरात मासे आल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. हा व्हिडिओ त्याअगोदरच जुना म्हणजेच ऑगस्ट 2020 मधील आहे.

Avatar

Title:पुराच्या पाण्याबरोबर घरात मासे आल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False