पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला का? वाचा सत्य

False राजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलव दरवाढीविषयीच्या प्रश्नाला बगल देत तत्काळ पत्रकार परिषदेतून पळ काढला, अशा दाव्यासह एक व्हिडियो क्लिप सध्या बरीच गाजत आहे. या व्हिडियोमध्ये पत्रकारांनी इंधन दरवाढीविषयी विचारलेल्या प्रश्नाला टाळत फडणवीस खुर्चीवरून वरून उठून निघू जाताना दिसतात. 

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, ही क्लिप अर्धवट आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

15 सेकंदाच्या क्लिपमध्ये पत्रकार ‘पेट्रोलवर बोला’ असे म्हणू लागताच फडणवीस स्टेजवरून उठतात व निघू लागतात. याला कॅप्शन देण्यात आली की, पेट्रोल दरवाढ प्रश्नावर फडणवीस पळून गेले.                                                 

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

व्हयरल होत असलेली क्लिप देवेंद्र फडणवीस यांनी 24 जून 2020 रोजी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतील आहे. फडणवीसांच्या अधिकृत ट्विटर आणि युटूयूब अकाउंटवरून या पत्रकार परिषदेचे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले होते. सर्वात शेवटी पत्रकार ‘पेट्रोल दरवाढ, पेट्रोल दरवाढ’ असे म्हणतात. तसेच एक जण त्यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाटाघाटी करीत असल्याबाबत विचारतो तेव्हा ते म्हणतात की, “यावर मी आधी बोललेलो आहे” आणि ते स्टेजवरून उठतात. परंतु, या व्हिडियोमध्ये व्हायरल होत असलेली क्लिप नाही. म्हणजे पत्रकार परिषद संपली होती.

संग्रहित

स्थानिक प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेविषयी काय वृत्त दिले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला असता स्वराज न्यूज मराठी या वृत्तवाहिनीने देवेंद्र फडणवीस हे पेट्रोल दरवाढीबद्दल काय म्हणाले, याबाबत दिलेले वृत्त आढळले. 

यात पत्रकारांनी पेट्रोल दरवाढीचा प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस थांबून म्हणतात की, आपल्याला माहिती आहे की ते पॉसावर असतं. की ते कंपन्यांना अधिकार आहेत. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढते त्यावेळेस वाढते. ज्यावेळी कमी व्हायची त्यावेळेस ती कमी होते. मागे ती कमीही झाली आणि वाढलीही. त्याच्यात सरकार डायरेक्ट काही करत नाही. 

शरद पवारांविषयक एक शब्दात असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्यावर मात्र ते काही न बोलता जाताना दिसत आहेत. आपण हा व्हिडियो खाली पाहू शकता.

फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचा व्हायरल व्हिडीओ आणि या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष 

यातून हे स्पष्ट होते की, सदरील व्हायरल क्लिप ही अर्धवट आहे. पत्रकारांनी पेट्रोल दरवाढीविषयी प्रश्न विचारल्यावर फडणवीसांनी उत्तर दिले होते. परंतु, पूर्ण क्लिप न दाखवता अर्धवट एडिट केलेली क्लिप फिरत आहे. 

Avatar

Title:पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False