युक्रेनचा सैनिक पत्नीला सोडून जातानाचा हा खरा व्हिडिओ नाही; हा तर चित्रपटातील सीन

False आंतरराष्ट्रीय

रशिया युक्रेन युद्धामुळे सोशल मीडियावर असंबंधित आणि जुन्या व्हिडिओ/फोटोंचा सुळसुळाट सुरू आहे. अशा अनेक व्हायरल क्लिप्सची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केलेली आहे. 

त्यात भर म्हणून आणखी एक भावनिक व्हिडिओ शेअर होत आहे. यात एका सैनिक युद्धासाठी रवाना होण्यापूर्वी पत्नीला साश्रुनयनांनी निरोप देत आहे. या व्हिडिओला युक्रेन युद्धाशी जोडले जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ युक्रेनमधील नाही, तसेच सध्या सुरू असलेल्या युद्धाशी याचा संबंध नाही. 

काय आहे व्हिडिओ?

मूळ व्हिडिओ – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओतील कीफ्रेम्सवर गुगल सर्च केले. त्यातून कळाले की, 2017 पासून हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ एका डॉक्युमेंटरीमधील आहे..

“The War of Chimeras: Story of Love, Life and Death” असे या डॉक्युमेंटरीचे नाव आहे. 2017 साली या माहितीपटाचा ट्रेलर युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.

Anastasiya Starozhytska यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केलेला आहे. युक्रेनमध्ये 2014 साली झालेल्या डॉनबॉस युद्धाविषयक हा माहितीपट आहे. 

निर्मात्यांची UATV English या वाहिनीवर मुलाखतसुद्धा उपलब्ध आहे. या मुलाखतीदरम्यानही व्हायरल क्लिपमधील दृश्य दिसतात. 

जगभरातील फॅक्ट-चेकर्स रशिया-युक्रेन युद्धाविषयक व्हायरल आणि खोट्या माहितीचे सत्य समोर आणत आहे. ते सर्व फॅक्ट-चेक्स तुम्ही ukrainefacts.org या वेबसाईटवर वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, एका माहितीपटातील दृश्य युद्धाला जाणाऱ्या सैनिकाचा खरा व्हिडिओ म्हणून शेयर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:युक्रेनचा सैनिक पत्नीला सोडून जातानाचा हा खरा व्हिडिओ नाही; हा तर चित्रपटातील सीन

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False