ऑस्ट्रेलियातील स्टेडियमचा व्हिडियो गुजरातमधील मोटेरा स्टेडियमच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचे विशेष आकर्षण ठरले ते गुजरातमधील मोटेरा स्टेडियम. अहमदाबाद येथे तयार झालेले हे नवे स्टेडियम 1.10 लाख प्रेक्षकसंख्येसह जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. सरदार पटेल स्टेडियम असे याचे अधिकृत नाव आहे. तर या स्टेडियमचा व्हिडियो म्हणून एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये स्टेडियमधील लाईट शोचा दाखविण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो मोटेरा स्टेडियमचा नसल्याचे स्पष्ट झाले.

काय व्हिडियोमध्ये?

मूळ पोस्टमध्ये येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसेल की, स्टेडियमच्या स्क्रीनवर Perth Stadium असे लिहिलेले आहे. 

यानुसार शोध घेतला असता कळाले की, हे ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातील ऑप्टस स्टेडियम आहे. 2018 साली त्याचे उद्घाटन झाले. एकुण 60 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियमला जगातील सर्वात सुंदर स्टेडियम म्हणूनही गौरविण्यात आलेले आहे. पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकारच्या अधिपत्याखाली हे बहुउद्देशीय स्टेडियम येते. स्टेडियमच्या युट्यूब चॅनेलवरून सध्या व्हायरल होत असलेल्या लाईट शोचा व्हिडियो शेयर केलेला आहे.

मग मोटेरा स्टेडियम कसे आहे?
गुजरात सरकारने 1983 साली या क्रिकेट स्टेडियमसाठी 100 एकर जागा दिली होती. तेथील जुने स्टेडियम पाडून हे नवे अद्यावत सरदार पटेल स्टेडियम बांधण्यात आले आहे. लवकरच त्याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिय म्हणून ते ओळखले जाणार आहे. बीबीसी हिंदीने त्यावर केलेला स्पेशल रिपोर्ट तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, ऑस्ट्रेलियातील पर्थ स्टेडियमचा व्हिडियो गुजरातमधील मोटेरा स्टेडियमच्या नावे पसरविण्यात येत आहे. तुमच्याकडेदेखी असे काही शंकास्पद व्हिडियो किंवा फोटो असतील तर ते फॅक्ट क्रेसेंडो मराठीकडे तथ्य पडताळणीसाठी पाठवून द्या.

Avatar

Title:ऑस्ट्रेलियातील स्टेडियमचा व्हिडियो गुजरातमधील मोटेरा स्टेडियमच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •