स्वातंत्र्यदिनाला दुबईमध्ये बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झळकला नाही का? वाचा सत्य

Missing Context राजकीय

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर त्या त्या देशाचा झेंडा झळकविला जातो. यंदा मात्र पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाला बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा झळकविण्यात आला नाही, असा दावा केला जात आहे. एका व्हिडिओद्वारे म्हटले जात आहे की, नाराज पाकिस्तानी नागरिकांनी तेथे आंदोलन केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा चुकीचा आहे. 14 ऑगस्ट रोजी बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला सांगते की, दुबईतील बुर्ज खलिफावर पाकिस्तानी ध्वज दाखवण्यास नकार दिला आहे. आपण या ठिकाणी जमावाद्वारे पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकू शकतो.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्क कॅप्शनमध्ये लिहितात की, “दुबई बुर्ज खलिफा बिल्डिंग वर पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यास नकार दिल्याबद्दल पाकिस्तानी नागरिकांचे बुर्ज खलिफा जवळ आंदोलन.” 

काही न्यूज वेबसाईट्सने व्हायरल व्हिडिओचा दाखला देत, “दुबईमध्ये बुर्ज खलिफावर पाकिस्तानी ध्वज दाखवण्यास नकार दिला,” अशा बातम्या प्रसारीत केल्या.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे.

पाकिस्तन डेलीच्या बातमीनुसार दुबईमध्ये बुर्ज खलिफावर पाकिस्तानी ध्वज न दाखवल्याने लोकांमध्ये नाराजी आणि राग निर्मण झाला होता. या घटनेनंतर काही वेळानी बुर्ज खलिफावर पाकिस्तानी ध्वज दाखविण्यात आला होता.

बुर्ज खलिफाच्या आधिकृत इंस्टाग्राम अकाउंवर इमारतीवर पाकिस्तानी ध्वज दाखविण्यात अल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. व्हिडिओ शेअर कताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी बुर्ज खलिफामध्ये ही रोषणाई करण्यात आली आहे. आम्ही पाकिस्तानच्या लोकांना अभिमानाने, एकतेने आणि समृद्धीने भरलेल्या दिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. भविष्यात सर्व पाकिस्तानी लोकांसाठी आणखी यश आणि आनंद मिळो. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!”

या पोस्टनंतर लतीफ नावाच्या युजरने कमेंटमध्ये हा व्हिडिओ केव्हाचा असल्याचे विचारल्यावर बुर्ज खलिफाच्या आधिकृत अकाउंटवरुन माहिती देण्यात आले होती की, काल (14 ऑगस्ट रोजी) संध्याकाळी 7:50 वाजता पाकिस्तानी ध्वज प्रदर्शित करण्यात आला होता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा चुकीचा आहे. 14 ऑगस्ट रोजी बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:स्वातंत्र्यदिनाला दुबईमध्ये बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झळकला नाही का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Missing Context