
देशभरात सध्या कॅब आणि एनआरसीविरोधात मोठ्य़ा प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातही असेच आंदोलन झाले असून सध्या या आंदोलनाची अनेक छायाचित्रे समाजमाध्यमात पसरत आहेत. यात एका छायाचित्राच्या आधारे पुरुषाने महिलेची वस्त्र परिधान करुन आंदोलन केल्याचा दावा करण्यात येत आहे. पराग नेरुरकर आणि ऑनलाईन नागपूर यांनीही हे छायाचित्र पोस्ट करत ही व्यक्ती जामियातील आंदोलन करणारी असल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
ट्विटरवरही हे छायाचित्र वेगवेगळ्या दाव्यासह पसरत असल्याचे दिसून येते.
तथ्य पडताळणी
बुरखा परिधान केलेला हा युवक नेमका कोण आहे, त्याने जामिया मीलियाच्या आंदोलनात सहभाग घेतलाय का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स सर्च केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला त्यात mauripress.net या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, दक्षिण अल्जेर्रियात लहान मुलांचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या वृत्तात आपण या आरोपीचे छायाचित्रही देण्यात आले आहे. 25 ऑक्टोबर 2018 रोजी हे वृत्त प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
संकेतस्थळावरील मुळ वृत्त / Archive
त्यानंतर आणखी एका संकेतस्थळावर 25 ऑगस्ट 2017 रोजी प्रसिध्द झालेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार ही व्यक्ती इजिप्तमध्ये लहान मुलाचे अपहरण करण्याचे प्रयत्न करत असताना तिला अटक करण्यात आली आहे.
इजिप्तमधील संकेतस्थळावरील वृत्त / Archive
त्यानंतर सैदा गेट या संकेतस्थळावर लेबनान न्यूज या विभागात या व्यक्तीविषयी तेथेही असत्य माहिती पसरत असल्याचे वृत्त 12 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिध्द झाल्याचे आम्हाला दिसून आले. अनेक देशात असत्य माहितीसह या व्यक्तीचे छायाचित्र पसरत असल्याचे या संशोधनात दिसून येत आहे.
निष्कर्ष
परदेशातील मुलांचे अपहरण करणाऱ्या एका आरोपीचा फोटो समाजमाध्यमात जामिया मीलियातील आंदोलन सहभागी असणाऱ्या व्यक्ती म्हणून पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही बाब असत्य आढळली आहे.

Title:Fact : ही दिल्लीत जामिया मीलिया विद्यापीठात आंदोलन करणारी व्यक्ती असल्याचे असत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
