
भाजपची प्रचार रॅली म्हणून सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. यामध्ये हजारो लोक अत्यंत शिस्तीमध्ये एका रांगेत प्रचार फेरी काढताना दिसतात. यामध्ये भगव्या रंगाचे कपडे घातलेले लोकदेखील आहेत. या फोटोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.
तथ्या पडताळणी
फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. डीएमसी टीव्ही या वेबसाईटवर व्हायरल फोटोशी साम्य असणारा फोटो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता.
Dhammakaya Media Channel (डीएमसी) हे बौद्ध धर्माविषयीचे टीव्ही चॅनेल आहे. याच्या वेबसाईटवरील बातमीनुसार, थायलंडच्या Samut Sakhon या शहरात 25 ऑक्टोबर 2015 रोजी दहा हजार भिक्खुंचा दीक्षा समारोह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या सोहळ्याचे हे द्वितीय वर्ष होते. शहरातील Ekkachai रोडवर हा सोहळा झाला होता. यामध्ये परिसरातील नऊ प्रभागांतील दहा हजार भिक्खुंचा समावेश होता.
सविस्तर बातमी व सोहळ्याचे इतर फोटो येथे पाहा – डीएमसी टीव्ही । अर्काइव्ह
वेबसाईटवरील इतर फोटोंमधून हे स्पष्ट होते की, फोटोत दिसणारे भगवे कपडे घातलेले लोक हे बौद्ध भिक्खू आहेत.
निष्कर्ष
भाजपच्या प्रचाराची रॅली म्हणून पसरविला जाणारा फोटो मूळात थायलंडमध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या दहा हजार भिक्खुंच्या दीक्षा समारोहाचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:भाजपची रॅली म्हणून थायलंडमधील भिक्खुंच्या दीक्षा सोहळ्याचा फोटो व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False
