Fact Check : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमदारांची घोषणा?

False राजकीय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांची घोषणा अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मनसे महाराष्ट्र सैनिक अधिकृत या पेजवरुन शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive 
तथ्य पडताळणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांची घोषणा कशी काय होऊ शकते, असे प्रश्न निर्माण होत असल्याने आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला भेट दिली. याठिकाणी अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही. मनसे अधिकृत फेसबुक पेजवरही आम्हाला याबाबतची कोणतीही माहिती आढळून आली नाही. मनसेच्या इन्स्टाग्राम पेजवरही आम्ही कोणतीही माहिती आढळून आली नाही. त्यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती आमदार आहेत, याची माहिती घेतली. त्यावेळी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मनसेचा एकही आमदार नसल्याचे दिसून आले. 

राज्यातील राजकीय पक्षांची माहिती देणाऱ्या महाराष्ट्र पॉलिटिकल पार्टीस या संकेतस्थळाला आम्ही भेट दिली. त्याठिकाणीही आम्हाला मनसेचा सध्या एकही आमदार असल्याचे दिसून आले नाही. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या संभाव्य उमेदवारांची घोषणा केली आहे का? याचा आम्ही गुगलवरही शोध घेतला. त्याठिकाणीही आम्हाला असे कोणतेही वृत्त दिसून आले नाही.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशीही आम्ही याबाबत संपर्क साधला असता त्यांनी पक्षाने संभाव्य उमेदवारांची कोणतीही यादी जाहीर केली नसल्याचे स्पष्ट केले.

निष्कर्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या संभाव्य उमेदवारांची कोणतीही यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळून आली आहे.

Avatar

Title:Fact Check : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमदारांची घोषणा?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False