FACT CHECK – फडणवीस सरकार निकम्मं आहे : उद्धव ठाकरे

Mixture राजकीय

सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमध्ये फडणवीस सरकार निकम्मं आहे, असे म्हटले आहे. राज्याला वेगळा गृहमंत्री हवा आहे असे लिहिले आहे. सोबतच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नावही लिहिलेले आहे.

फेसबुकअर्काईव्ह

पोस्टमध्ये फडणवीस सरकार निकम्मं आहे, महाराष्ट्रात बिहारपेक्षा वाईट परिस्थिती, राज्याला स्वतंत्र्य गृहमंत्री हवा आहे :  उद्धव ठाकरे असे लिहिलेले आहे. सोबतच एबीपी माझा या न्युज चॅनलवर उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि राज्याला वेगळा गृहमंत्री हवा आहे असे वाक्य म्हटल्याचा फोटो देण्यात आलेला आहे.

सत्य पडताळणी

व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्याप्रमाणे गुगलवर उद्धव ठाकरे असे म्हणाले का हे सर्वप्रथम शोधले. त्यानंतर पोस्टमध्ये करण्यात आलेले वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एप्रिल 2018 मध्ये केले आहे असे संशोधनाअंती समोर आले आहे.

ज्यावेळी युती सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद सुरु होते, त्यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथील एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले होते. खाली दिलेल्या लिंकवर आपण यासंदर्भातील बातम्या वाचू शकता.

दैनिक लोकसत्ताअर्काईव्ह

दैनिक लोकसत्ताअर्काईव्ह

पोलीसनामाअर्काईव्ह

वेब दुनियाअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्टमधील मजकूर हा एप्रिल 2018 या काळातील आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. वर्तमान परिस्थितीत भाजप-शिवसेना युती कायम आहे, आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतेही देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं आहे असे वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे जुनी पोस्ट लोकसभा 2019 च्या अनुषंगाने जाणीवपुर्वक पसरविण्यात येत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या पोस्टमधील मजकूर हा जुना आहे.

युट्युबवर एबीपी माझा या चॅनलवर 02.20 मिनीटांपासून 03.55 मिनीटांपर्यंत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य आपण पाहू शकता. हा व्हिडिओ 25 एप्रिल 2018 रोजी एबीपी माझा या चॅनलने अपलोड केलेला आहे.

निष्कर्ष : व्हायरल पोस्टमधील मजकूर हा जुना आहे. एप्रिल 2018 या वर्षी अहमदनगर येथील एका पत्रकार परीषदेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र सरकार संदर्भात वक्तव्य केले होते. परंतू वर्तमान परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र सरकार यांच्याविषयी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. वर्तमान परिस्थितीत भाजप-शिवसेना युती आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट संमिश्र स्वरुपाची आहे.

Avatar

Title:FACT CHECK – फडणवीस सरकार निकम्मं आहे : उद्धव ठाकरे

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture