भाजपच्या संकल्पपत्रात चौकीदार चोर है असलेला फोटो सत्य आहे का? : सत्य पडताळणी

False राजकीय | Political

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही हातात भाजपचे संकल्पपत्र घेऊन उभे आहेत. परंतू त्या संकल्पपत्राच्या मुखपृष्ठावर चौकीदार चोर है असे लिहिलेले आहे असा फोटो आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून या पोस्टबद्दल सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर मिलिंद जाधव नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे दोघेही स्वतःच्या हातात भाजप 2019 लोकसभेसाठी तयार करण्यात आलेले संकल्पपत्र घेऊन उभे आहेत. या संकल्पपत्रावर चौकीदार चोर है असे लिहिलेले दिसत आहे. या पोस्टबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने या फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज केले. त्यानंतर भाजप संकल्पपत्राचा खरा फोटो आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो यामध्ये फरक आहे हे समोर आले.

भाजप पक्षाचा लोकसभा निवडणूक 2019 साठी तयार करण्यात आलेले मुळ संकल्पपत्र आणि त्या संकल्पपत्राचे मुखपत्र आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतील भाजप संकल्पपत्राचे मुखपृष्ठ हे दोन्हीही वेगवेगळे आहेत हे संशोधन केल्यानंतर समोर आले आहे. या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाअर्काईव्ह

द ईकॉनॉमिक टाईम्सअर्काईव्ह

भाजप पक्षाचा लोकसभा 2019 साठी संकल्पपत्र 08 एप्रिल 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, तसेच भाजपच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात ट्विटरवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर ट्विट अपलोड करण्यात आले आहे.

अर्काईव्ह

या विषयावर राज्यसभा टीव्ही या युट्युब चॅनलवर लोकसभा 2019 साठी भाजप संकल्पपत्र जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ 08 एप्रिल 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये 20:01 ते 20:54 सेकंदापर्यंत भाजप 2019 संकल्पपत्र जाहीर करण्यात आलेला आहे.

भाजप 2019 साठीच्या मुळ संकल्प पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि संकल्पपत्र एवढेच मुखपृष्ठावर लिहिण्यात आले आहे. यावरुन हे लक्षात येते की, भाजपचा लोकसभा 2019 साठी मुळ संकल्पपत्र आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटो हा फोटोशॉप करुन करण्यात आलेला आहे. व्हायरल होणाऱ्या भाजप लोकसभा 2019 संकल्पपत्राच्या मुखपृष्ठावर चौकीदार चोर है हे फोटोशॉपद्वारे लिहिण्यात आले आहे. खाली आपण भाजप 2019 मुळ संकल्पपत्र आणि व्हायरल होणारा फोटोशॉपद्वारे तयार करण्यात आलेले मुखपृष्ठ या दोघांतील फरक बघू शकता.

संपुर्ण संशोधनानंतर सोशल मीडियावर व्हायरल होणारा भाजप लोकसभा 2019 साठी तयार करण्यात आलेल्या संकल्पपत्राच्या मुखपृष्ठाच्या फोटोवर चौकीदार चोर है हे फोटोशॉपद्वारे तयार करण्यात आलेले आहे. भाजपच्या मुळ संकप्लपत्राच्या मुखपृष्ठावर केवळ संकल्पपत्र असे लिहिलेले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा भाजप लोकसभा 2019 साठी संकल्पपत्राच्या मुखपृष्ठाच्या फोटोवर चौकीदार चोर है हे तथ्य खोटे आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या भाजप लोकसभा 2019 साठी संकल्पपत्र मुखपृष्ठ फोटो चौकीदार चोर है हा फोटोशॉपद्वारे तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे व्हायरल होणारा फोटो हा खोटा आहे.  

Avatar

Title:भाजपच्या संकल्पपत्रात चौकीदार चोर है असलेला फोटो सत्य आहे का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False