आम आदमी पार्टीने ‘गुजरात नमाज पठण करणार’ असे पोस्टर जारी केले नव्हते; वाचा सत्य 

Altered राजकीय | Political

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीने लावलेल्या एका कथित पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिलेले आहे की, भागवत सप्ताह आणि सत्यनारायण कथा सोडून आता गुजरात नमाज पठण करणार.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणी हा दावा खोटा आढळला आहे. व्हायरल होत असलेले पोस्टर बनावट आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टरमध्ये गुजराती भाषेत लिहिलेले आहे की, “भागवत सप्ताह आणि सत्यनारायण कथांना सोडून गुजरातच्या लोकांनी आता नमाज पठण केले पाहिजे.” 

दावा केला जात आहे की, आम आदमी पार्टीने गुजरात निवडणुकीदरम्यान हे पोस्टर जारी केले आहे. युजर्स व्हायरल फोटो शेअर करत लिहितात की, ‘‘तरी देखील देशाचे हिंदू या पक्षाला मत का देतात?’’

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल पोस्टरला रिव्हर्स इमेज सर्च केले असता एक फेसबुक पोस्ट मिळाली. त्यामध्ये कमलेशभाई वंसफोडा यांनी 6 जुलै 2021 रोजी फेसबुक अकांउटवर ‘आप’चे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये गुजराती भाषेत ‘आता बदलेल गुजरात’ असे लिहिलेले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक 

पुढे गुजरात टॉक्स युट्युब चॅनलवर इसुदान गाढवी यांनी 19 जुलै 2021 रोजी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, व्हायरल पोस्टर बनावट असून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले होते. त्यांनी बनावट पोस्टर आणि खरे पोस्टरचे तुलनात्मक फोटो दाखवत फरक स्पष्ट केला. तसेच या विरोधात ‘आप’ पक्षाने गुन्हा दाखल केला होता. यावरून लक्षात येते की, व्हायरल होत असलेले पोस्टर मागील वर्षाचे आहे.

आप पक्षाने वकील ऋषिकेश कुमार यांचे ट्विट आपल्या गुजरात अकांउटवर शेअर केले आहे. त्यामध्ये ऋषिकेश यांनी पोस्टरवर ट्विट केले होते की, हा फोटो बनावट असून त्यांच्याविरोधात 153 A, 295, 505 part II, 66D IT Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हायरल पोस्टर आणि मूळ पोस्टर यामधील फरक खाली दिलेल्या तुलनात्मक फोटोत पाहू शकतो.

तसेच इसुदान गाढवी यांनी पत्रकारांना मुलाखत देताना आपली नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, व्हायरल पोस्टरमध्ये आम आदमी पार्टीचे गुजरात प्रमुख गोपाल ईटालियांचा चेहरा एडिट करून एका दहशतवाद्याप्रमाणे दाखवला आहे.

व्हायरल पोस्टरमध्ये गोपाल ईटालिया यांच्या चेहरा दहशतवादी संघटना अन्सार अल-इस्लामचा संस्थापक ‘मृत’ मुल्लाह क्रेकरच्या फोटोवर एडिट करून लावला आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल पोस्टर बनावट असून “भागवत सप्ताह व सत्यनारायण कथा  फालतू असून त्यांना सोडून गुजरातच्या लोकांनी नमाज वाचली पाहिजे” असे लिहिलेले नव्हते खोट्या दाव्यासह जुने पोस्टर पुन्हा व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:आम आदमी पार्टीने ‘गुजरात नमाज पठण करणार’ असे पोस्टर जारी केले नव्हते; वाचा सत्य 

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered