
मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर मोठे आर्थिक संकट येईल आणि बेरोजगारी वाढेल, अशी चिंता जागतिक बँकेने व्यक्त केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
जागतिक बँकेने भारताला खरंच काय इशारा दिला आहे. याची पडताळणी करताना आम्हाला बीबीसीचे हे वृत्त दिसून आले. या वृत्तात जागतिक अर्थव्यवस्थेला असलेल्या धोक्याबाबत इशारा देण्यात आला आहे. यात कुठेही मोदी सत्तेत आल्यास काय घडू शकते यावर भाष्य केलेले नाही.

जागतिक बँकेच्या संकेतस्थळावर जाऊनही आम्ही याबाबतची काही मिळती का? हे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कोणतीही माहिती आढळून आली नाही.

त्यानंतर आम्ही पोस्टमधील छायाचित्रात असणारी व्यक्ती कोण आहे याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला द हिंदू या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार हे जागतिक बॅंकेचे अध्यक्ष असून ते एक फेब्रुवारी रोजी पायउतार होणार आहेत.

द इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जिम योंग किम यांनी अनेक वेळा मोदी यांचे कौतुक केल्याचे दिसत आहे. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर मोठे आर्थिक संकट येईल आणि बेरोजगारी वाढेल, अशी चिंता त्यांनी अथवा जागतिक बँकेने व्यक्त केल्याचे वृत्त मात्र कुठेही दिसून येत नाही.

निष्कर्ष
मोदी सरकार परत सत्तेत येण्याबाबत जागतिक बँकेने चिंता व्यक्त केल्याचे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Title:सत्य पडताळणी : मोदींच्या परत सत्तेत येण्याबाबत जागतिक बँकेने व्यक्त केली चिंता?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
