Fact Check : पाकिस्तानमध्ये एकाच दिवशी तब्बल 500 हिंदूंचं धर्मांतरण?

False आंतरराष्ट्रीय

(फोटो सौजन्य : लोकमत न्यूज 18)

पाकिस्तानमध्ये एकाच दिवशी तब्बल 500 हिंदूंचं धर्मांतरण, नापाक पाकने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवून दिली अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. Nilesh Parab यांनी Aamhi dombivlikar या पेजवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी 

पाकिस्तानमध्ये एकाच दिवशी 500 हिंदूंचे धर्मांतरण झाले आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगलवर पाकिस्तान मध्ये एकाच दिवशी तब्बल ५०० हिंदूंचं धर्मांतरण असे सर्च केले. त्यावेळी आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. अशी घटना नुकतीच घडल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही 500 hindus converted in islam in one day at pakistan असे टाकल्यावर खालील निकाल दिसून दिला. 

यातील लोकमत न्यूज 18 च्या 25 जून 2019 रोजी देण्यात आलेल्या वृत्तात पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदूंच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जे हिंदू भारतातून परत गेले त्या सगळ्यांचं धर्मांतर झाल्याच्या घटनेनं खळबळ माजली. ते हिंदू भारतात आश्रयासाठी आले होते, असे म्हटले आहे.

लोकमत न्यूज 18 / Archive

त्यानंतर आम्हाला द टाईम्स ऑफ इंडियाने 30 मार्च 2018 रोजी प्रकाशित केलेले एक वृत्त दिसून आले. पाकिस्तानमधील हैदराबाद येथील मताली येथे हिंदूंचे धर्मातर करण्यात आल्याचे आणि हे सर्व हिंदू भिल्ल असल्याचे

या वृत्तात म्हटले आहे. जोधपूर येथून पाकिस्तानात परतलेले हे हिंदू असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.  

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive 

रिपब्लिक वर्ल्ड या वृत्तवाहिनीने 27 मार्च 2018 रोजी पाकिस्तानमधील हिंदूंच्या धर्मातराचे एक वृत्त दिले आहे. या वृत्तातही जोधपूरमधून पाकिस्तानात परतलेल्या हिंदूचे धर्मातर करण्यात आल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

पाकिस्तानमधून प्रसिध्द होणाऱ्या डॉन, द नेशन या वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर अशा घटनेचे कोणतेही वृत्त दिसून येत नाही. पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांमध्येही असे वृत्त दिसत नाही.   

निष्कर्ष

पाकिस्तानमध्ये एकाच दिवशी तब्बल 500 हिंदूंचं धर्मांतर करण्यात आल्याची घटना ही मार्च 2018 मध्ये घडली असल्याचे विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात दिसून येत आहे. अशी घटना पुन्हा घडल्याचे दिसत नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.  

Avatar

Title:Fact Check : पाकिस्तानमध्ये एकाच दिवशी तब्बल 500 हिंदूंचं धर्मांतरण?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False