
डॉ. विकास आमटे यांनी कर्करोगावर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय म्हणून सध्या समाजमाध्यमात एक संदेश पसरत आहे. स्वच्छ धुतलेले लिंबू फ्रिजरमध्ये ठेवावे आणि कडक झाल्यावर आठ ते दहा तासांनी ते सालासकट किसून घेऊन सर्व पदार्थाबरोबर खावे, अशा स्वरूपाचा हा उपाय यामध्ये सांगितलेला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सदरील मेसेजमधील दावा असत्य असल्याचे सिद्ध झाले.
काय आहे दावा?
मेसेजमध्ये कर्करोग बरा होण्यासाठी डॉ. विकास आमटे यांनी लिंबू खाण्याचा सल्ला दिला असेल म्हटले आहे. “अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा. ते लिंबू पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडक झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेऊन ते सर्व लिंबू सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबू टाकुन खा,” यासह विविध प्रकार सांगितलेले आहेत.
तथ्य पडताळणी
कर्करोगावरील उपचाराबाबत डॉ. विकास आमटेंच्या नावाने पसरत असलेला हा संदेश त्यांचा आहे का, हे जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल मेसेजचे खंडन करीत असा कोणताही संदेश आपण जारी केला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ते अॅलोपॅथी तज्ज्ञ असल्याचे सांगितले.
हे तर स्पष्ट झाले की, व्हायरल मेसेज डॉ. विकास आमटे यांचा नाही. मग त्यात सांगितलेल्या उपायांमध्ये काही तथ्य आहे का?
आर्कान्सस विद्यापीठाच्या वैद्यकीय विज्ञान शाखेच्या संकेतस्थळावरील एक लेख आढळला. कर्करोग बरा करण्यात लिंबाचा रस किती प्रभावी आहे हे सांगणाऱ्या मेसेजबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे.
त्यात म्हटले आहे की, अलिकडे काही संशोधनांमध्ये लिंबामधील काही गुणधर्म काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरला रोखण्यात प्रभावी ठरू शकतात असे दिसून आले. त्यामुळे सदरील मेसेजला अनेक लोक खरे मानत आहेत. परंतु, लिंबू किंवा त्याच्या रसामुळे कॅन्सर बरा होतो, असा दावा करता येत नाही.
अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर हेल्थ रिसर्चने देखील लिंबाने किंवा लिंबाच्या रसाने कर्करोग बरा होतो, याला कोणताही योग्य असा वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील अनेक वर्षापासून हा दावा इंटरनेटवर दिसून येते आहे. ब्रिटनमधील कॅन्सर रिसर्च युकेने देखील हा दावा असत्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
निष्कर्ष
कर्करोगावरील उपचाराबाबत नावाने पसरत असलेला संदेश असत्य असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. तसेच जगभरातील वैद्यकीय संशोधकांनी लिंबू अथवा त्याच्या रसाने कर्करोग बरा होत असल्याचा दावा असत्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
.container { border: 2px solid #000; background-color: #eee; border-radius: 5px; padding: 16px; margin: 16px 0 } .container::after { content: “”; clear: both; display: table; } .container img { float: left; margin-right: 20px; border-radius: 50%; } .container span { font-size: 20px; margin-right: 15px; } @media (max-width: 500px) { .container { text-align: center; } .container img { margin: auto; float: none; display: block; } }
Title:कर्करोगावरील उपचाराबाबत डॉ. विकास आमटेंच्या नावाने पसरत असलेला संदेश खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
