पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला ? : सत्य पडताळणी

False आरोग्य

सोशल मीडियावर सध्या पोटाची चरबी कमी करण्याचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट 307 वेळा शेअर व 454 वेळा लाईक्स करण्यात आली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पोटावर साचलेली चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात आला आहे. यामध्ये हळद, दालचिनी, मेथीदाणे, काळे जीरे, सुंठ, ओवा, काळे मिरे यांचे विशिष्ट प्रमाण एकत्रित करुन मिक्सरमधून बारिक करुन, ती पूड सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये टाकून दररोज सकाळ – संध्याकाळ जेवणाच्या आधी घेतल्यास पोटावरील चरबी कमी होते.

या विषयावर सोशल मीडियावर विविध ठिकाणी ही पोस्ट व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सर्व साहित्य एकत्रित करुन तयार करण्यात आलेल्या पुडमुळे होणारे फायदे असे सांगितले आहे.

  • रेग्युलर घेण्यामुळे बॉडीतील जमा एक्स्ट्रा चरबी हळूहळू विरघळून निघून जाते.
  • हा फॉर्म्युला बॉडीतील शुगर लेवल बॅलेंस ठेवतो, आणि वाढलेल्या शुगरला नॉर्मल करतो.
  • बॉडीतील टॉक्सिक निघून जातात, स्कीन चांगली होते, साधारण आजारपण दूर राहते.
  • एंटी ऑक्सिडेंटस् तत्व एजिंग प्रोसेस स्लो करते, तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसाल.
  • यामुळे लिव्हर व किडणीवर ताण टाकणारे टॉक्सिक पदार्थ बॉडीच्या बाहेर जातात आणि ऑर्गन हेल्दी राहतात.
  • या फॉर्म्युल्याने पचनशक्ती चांगली होते. गॅस, बद्धकोष्टता, असिडिटी, आंबट ढेकर सारखे प्रॉब्लेम दूर होतात.

या प्रत्येक मुद्यावर फॅक्ट क्रिसेंडोच्या टीमने आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. आकांक्षा काळे – पाटील आणि आयुर्वेदिक डॉ. ज्योती यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी प्रत्येक मुद्द्याबाबत सविस्तर माहिती सांगितली.

आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे का?

डॉक्टर ज्योती यांच्यामते हा फॉर्म्युला आयुर्वेदिक फॉर्म्युला नाहीये. कारण सर्व जिन्नस बारीक करुन सफरचंद व्हिनेगारमध्ये टाकून पिणे. त्यापैकी सफरचंद व्हिनेगार हे आयुर्वेदिक नाहीये. म्हणून हा फॉर्म्युला आयुर्वेदिक नाहीये.

एक्स्ट्रा चरबी हळूहळू विरघळते का?

डॉक्टर ज्योती आणि डॉ. आकांक्षा यांच्या मते एक्स्ट्रा चरबी विरघळते हे चुकीचे आहे. असे आपण ठामपणे सांगू शकत नाही की, चरबी विरघळेल.

शुगर लेवल नॉर्मल राहते का?

या औषधाच्या सेवनाने शुगर लेवल नॉर्मल राहते हे चुकीचे आहे. कारण केवळ औषधाने नव्हे तर व्यायाम आणि आहार, त्यानंतर औषध या तीन गोष्टींमुळे शुगर लेवल नॉर्मल होत असते, असे डॉ. आकांक्षा यांनी सांगितले.

बॉडीतील टॉक्सिक निघून जातात, स्कीन चांगली होते का?

डॉ. आकांक्षा यांच्या मते हळद ही एंटीसेप्टीक आहे. हळदीचा उपयोग स्किन प्रॉब्लेम कमी करण्यासाठी नक्कीच होतो. पण केवळ हळद हा एकच घटक उपयोगाचा नसून, आहारातील इतर अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये होतो.

एजिंग प्रोसेस स्लो करते का?

या फॉर्म्युल्यामुळे एजिंग प्रोसेस स्लो होत नाही, असे मत डॉ. ज्योती आणि डॉ. आकांक्षा यांनी मांडले.

लिव्हर आणि किडनीवरील ताण कमी होतो का?

याबद्दल बोलताना डॉ. आकांक्षा यांनी असे स्पष्टपणे म्हटले आहे की, लिव्हर आणि किडनीवरील ताण कमी होतो, याविषयी स्पष्टपणे काही सांगता येत नाही.

फॉर्म्युल्याने पचनशक्ती चांगली होते का?

एकत्रित करण्यात येत असलेल्या जिन्नसमध्ये सुंठ, ओवा, दालचिनी हे पदार्थ असल्या कारणाने पचनशक्ती चांगली होण्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरते, असे दोन्हीही आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले.

सर्वात महत्वाचा प्रश्न पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे का?  

या विषयावर डॉ. ज्योती आणि डॉ. आकांक्षा यांनीही नकार दिला आहे. त्यांच्या मते जर हे औषध घेतल्यावर एखाद्या व्यक्तीचा पोटातील गॅस निघून गेल्यावर त्याच्या पोटाच्या घेराच्या सेंटीमीटरमध्ये फरक जरुर पडेल. परंतू या फॉर्म्युल्यामुळे पोटाची चरबी कमी होतो हे सांगता येत नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला पोटाची चरबी कमी करु शकत नाही.

खाली आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. ज्योती आणि डॉ. आकांक्षा काळे – पाटील या दोन्हीही डॉक्टरांचे फोन नंबर देत आहोत.

डॉ. ज्योती कस्तुरे
एम डी. आयुर्वेद, औरंगाबाद
फोन नं – 9049603419
डॉ. आकांक्षा काळे – पाटील
बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक), औरंगाबाद
फोन नं – 8788053523

सर्व तथ्य पडताऴून पाहिल्यानंतर हा फॉर्म्युला आयुर्वेदिक फॉर्म्युला नाही असे आढळून आले. तसेच या फॉर्म्युलाचा उपयोग करुन पोटाची चरबी कमी होत नाही.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट पोटाची चरबी कमी करण्याचा नं 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला यामुळे पोटाची चरबी कमी होत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या टीमकडून पडताळण्यात आल्यानंतर हा आयुर्वेदिक फॉर्म्युलाच नाही असे समोर आले आहे. म्हणूनच पोटाची चरबी कमी करण्याचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला हे तथ्य खोटे आहे.

Avatar

Title:पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला ? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False