लोकसभेचा रणसंग्राम 11 एप्रिलपासून सुरू होत आहे. सात टप्प्यांमध्ये मतदान होऊन 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधीच सोशल मीडियावर अशा पोस्ट फिरत आहेत की, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे दोन खासदार बिनविरोध निवडून आले. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

अर्काइव्ह

पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवभारताच्या विजयी पर्वाची सुरुवात. अरुणाचल प्रदेश येथील भाजप उमेदवार केंटो जीनी (आलो पूर्व) आणि ताबा तेदीर (यचूली) यांची खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली. खरंच याची खासदार म्हणून निवड झाली का?

तथ्य पडताळणी

गुगलवर याचा शोध घेतला असता लोकमतची एक बातमी समोर आली. 26 मार्च रोजीच्या या बातमीमध्ये म्हटले की, अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांमध्ये आलो ईस्ट आणि यचुली या दोन विधानसभा क्षेत्रातून भाजपचे सर किंटो जिनी आणि ताबा तेदीर यांची बिनविरोध निवड झाली. म्हणजे ही खासदारकीची निवडणूक नव्हती.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमतअर्काइव्ह

गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करून ही माहिती दिल्याचे बातमीत म्हटले आहे. त्यांचे 26 मार्चचे ट्विट खाली दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भाजपने पहिला विजय नोंदविला. भाजप आमदार उमेदवार केंटो जिनी यांची अरुणाचल प्रदेशमधील आलो ईस्ट मतदारसंघातून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यचुली विधानसभा मतदारसंघातून ताबा तेदीर यांचीदेखील बिनविरोध निवड झाली.

https://twitter.com/KirenRijiju/status/1110497295680917505

अर्काइव्ह

भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश, सिक्कीम येथे लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेचीसुद्धा निवडणूक होत आहे.

मूळ नोटिफिकेशन येथे पाहा – निवडणूक आयोगअर्काइव्ह

पीटीआयने 28 मार्च रोजी दिलेल्या बातमीनुसार, अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे तीन आमदार बिनविरोध निवडून आले. यामध्ये किंटो जिनी आणि ताबा तेदीर यांचा समावेश आहे.

मूळ बातमी येथे वाचा – पीटीआयअर्काइव्ह

निष्कर्ष

भारतीय निवडणूक आयोग आणि बातम्यांवरून हे सिद्ध होते की, किंटो जिनी आणि ताबा तेदीर हे आमदार म्हणून निवडून आले. ते खासदार नाहीत. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः अरुणाचल प्रदेशमध्ये दोन भाजप खासदारांची म्हणून बिनविरोध निवड?

Fact Check By: Mayur Deokar

Result: False