Fact Check : जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने दिले आहेत का?

False सामाजिक

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच किंग सर्कलच्या जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणपतीला 264 कोटींचे दागिने चढवले आहेत. काय म्हणावं अशा लोकाना, अशी माहिती
Sanjiv Pednekar यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु असतानाच जीएसबी मंडळाने गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने घातल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पसरत आहेत. आम्ही जीएसबी गणेशोत्सव मंडळ गणपतीला 264 कोटींचे दागिने असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला ‘दिव्य मराठी’च्या संकेतस्थळावरील खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात जीएसबी गणपतीने 2018 मध्ये 264 कोटींचा विमा उतरविला असल्याचे म्हटले आहे.

दिव्य मराठी / Archive

दिव्य मराठीने 25 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या वृत्तानुसार जीएसबीच्या बप्पाच्या अंगावर 20 कोटी रुपये किमतीचे सूवर्ण अलंकार आहेत. गणपती मूर्ती आणि सभामंडपाचा मंडळाने 264.25 कोटी रुपयांचा इन्श्युरन्स उतरवला होता. दहशतवादी हल्ला, जातीय दंगल, पुरस्थितीमुळे होणारे नुकसान याचा या इन्श्युरन्समध्ये समावेश होता. जीएसबी सेवा मंडळाचे सदस्य आर.जी. भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार हा इन्श्युरन्स स्थापनेपासून विसर्जनापर्यंतचा असतो.

दिव्य मराठी / Archive

पोलिसनामाने 28 ऑगस्ट 2019 रोजी दिलेल्या वृत्तात जीएसबी किंग सर्कलच्या मंडळाने मागील वर्षाच्या 264 कोटीच्या तुलनेत यंदा 266 कोटींचा विमा उतरविल्याचे म्हटले आहे. 

पोलिसनामा / Archive

डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळानेही मंडळाकडून 266 कोटींचा विमा उतरविल्याचे वृत्त दिले आहे. जीएसबी सेवा मंडळाच्या संकेतस्थळावर आणि व्हेरिफाईड फेसबुक अकाऊंटवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

निष्कर्ष   

जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने घातलेले नाहीत. ‘जीएसबी’ने 2018 मध्ये 264 कोटींचा विमा उतरविला होता. यात केवळ दागिन्यांचा नव्हे तर अन्य बाबींचाही समावेश होता. यंदा (2019) मंडळाने 266 कोटींचा विमा उतरविला आहे. ती दागिन्यांची किंमत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : जीएसबी गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपतीला 264 कोटी रुपयांचे दागिने दिले आहेत का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False