
काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते गाईला माता मानण्याविषयी आक्षेप घेत म्हणतात की, “गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्थवट आहे. दिग्विजय सिंह सावरकरांच्या पुस्तकात काय लिहिले ते सांगते होते.
काय आहे दावा ?
झी न्यूजच्या बातमीच्या क्लिपमध्ये दिग्विजय सिंह म्हणतात की, “गाय एक असा प्राणी आहे जो स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळतो, ती आपली माता कशी? आणि गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळाणी
रिव्हर्स इमेज केल्यावर कळले की, हा व्हिडिओ 25 डिसेंबर 2021 रोजी भोपालच्या तुलसीनगरमधील नर्मदा मंदिर भवनात पार पडलेल्या ” जानजागरूकता अभियान” सभेचा आहे.
दिग्विजय सिंह या सभेत म्हणाले होते की, सावरकर गायीचे मांस खाण्यास समर्थन करीत होते.
दिग्विजय सिंह हे भाषण रिपब्लिक इंडियाच्या युट्युब चॅनलवर प्रसारीत करण्यात आले होते.
वरील भाषण पाहिल्यावर लक्षात येते की, गायीविषयी त्यांनी केलेले वक्तव्य अर्धवट व्हायरल होत आहे.
दिग्विजय सिंह म्हणतात की, “भाजपचे खास विचारक स्वत: सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहे की, “गाय एक असा प्राणी आहे जो स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळण घेतो, ती आपली माता कशी? आणि गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही.” हे स्वत: सावकरांनी म्हटलेले आहे.”
सदरील वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विट करीत या व्हिडिओविषयी स्पष्टीकरण दिले होते की, त्यांचा अर्धवट व्हिडिओ शेअर केला जात आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळ व्हिडिओमध्ये दिग्विजय सिंह म्हणतात की, ‘गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही’ हे स्वत: सावरकरांनी म्हटलेले आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:‘गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही’; दिग्विजय सिंह यांचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Partly False
