लॉकडाऊनमुळे कोकण किनारपट्टीवर हरीण आल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे रस्ते ओस पडले असून पर्यटनस्थळेही याला अपवाद नाहीत. यामुळे प्राण्यांचा शहरातील रस्त्यांवर मुक्तसंचार सुरू असल्याचे अनेक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहेत. अशाच एका व्हिडियोमध्ये एक सुंदर हरीण समुद्रस्नानाचा घेताना दिसते. हा व्हिडियो कोकणातील कर्दे दापोली समुद्रकिनाऱ्यावरील असल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला.

काय आहे व्हिडियोमध्ये?

फेसबुकवरील मूळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

हा व्हिडियो नेमका कुठला आहे शोधण्यासाठी की-फ्रेम्स गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्या. त्यातून कळाले की, हा व्हिडियो 2015 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

अँथनी मार्टिन या फ्रेंच फिल्ममेकरने 10 नोव्हेंबर 2015  रोजी फेसबुकवर हा व्हिडियो अपलोड केला होता. 

Archive

The Dodo नावाच्या संकेतस्थळावर 21 डिसेंबर 2015 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या लेखानुसार, समुद्राच्या पाण्यात खेळणाऱ्या या हरणाचा व्हिडियो अँथनी मार्टिन यांनी चित्रीत केला होता. विविध वेबसाईटवरील माहितीनुसार फ्रान्समधील दक्षिणपूर्व किनारपट्टीवरील हे दृश्य आहे.

The Dodo / Archive

हा व्हिडियो युटूयूबवर Buscando sentidos यांनी 9 मार्च, 2019 रोजी पोस्ट केला असल्याचे दिसून आले. Higgs Boson यांनी हा व्हिडियो 12 नोव्हेंबर 2015 रोजी पोस्ट केला असल्याचे दिसून येते. 

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो जूना आहे. त्याचा सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनशी काही संबंध नाही. तसेच हा व्हिडियो कोकणातील कर्दे दापोली येथील नाही. तो फ्रान्समधील आहे.

Avatar

Title:लॉकडाऊनमुळे कोकण किनारपट्टीवर हरीण आल्याचा हा व्हिडियो नाही. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False