CAA विरोधी आंदोलनात तिरंगा जाळण्यात आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानमधील आहे. वाचा सत्य

False राजकीय | Political

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) या दोन्ही कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी सोशल मीडियावर अनेक चुकीचे फोटो आणि व्हिडियो पसरविले जात आहेत. तिरंगा जाळत असल्याचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सीएए आंदोलनामध्ये भारताचा झेंडा जाळण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला असता कळाले की, हा फोटो भारतातील नाही. हा फोटो तर पाच वर्षांपूर्वीचा पाकिस्तानातील आहे.

असोसिएट प्रेस (AP) या वृत्तसंस्थेच्या वेबसाईटवर हा फोटो उपलब्ध आहे. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो पाकिस्तानातील मुलतान शहरातील आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश निर्मितीविषयीच्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी तेथील काही लोकांनी 11 जून 2015 रोजी भारतीय तिरंगा जाळला होता. हा फोटो त्याचा आहे. ‘एपी’ फोटोग्राफर आसिम तनवीर यांना हे छायाचित्र घेतले होते.

मूळ फोटो येथे पाहा – APअर्काइव्ह

यावेळीचा इतर फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्यावर्षी हाच फोटो व्हायरल करून तो भारतातील असल्याचे पसरविण्यात आला होता. परंतु, तेव्हा ऑल्ट न्यूज, इंडिया टुडे, एएफपी आदींने त्याचे फॅक्ट चेक केले होते.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, तिरंगा जाळल्याचा हा फोटो सध्या सुरू असलेल्या सीएए आंदोलनतातील नाही. हा फोटो पाकिस्तानच्या मुलतान शहरातील आहे. मोदींच्या एका वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तेथे 11 जून 2015 रोजी पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय झेंडा जाळला होता. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:CAA विरोधी आंदोलनात तिरंगा जाळण्यात आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानमधील आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False