आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल
आदित्य ठाकरे विविध ठिकाणी शिवगर्जना सभा घेत आहेत. 13 मार्च रोजी त्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात शिंदे-भाजप युतीवर जोरदार टीका करणारे भाषण केले.
या पार्श्वभूमीवर झी-24 तास वाहिनीच्या बातमीचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री म्हणजेच त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांना ‘करप्ट माणूस’ म्हटल्याचे दिसते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले स्क्रीनशॉट बनावट आहे.
काय आहे दावा ?
सदरील स्क्रीनशॉटमध्ये झी-24 तासच्या लोगो व आदित्य ठाकरेंच्या फोटोसह लिहिलेले आहे की, ‘माजी सीए म्हणजे करप्ट माणूस.’
हा फोटो शेअर करून म्हटले आहे की, “माजी मुख्यमंत्री म्हणजे आपल्या बापाबद्दल इतकं खरं बोलू नये.”
तथ्य पडताळणी
स्क्रीनशॉटला रिव्हर्स इमेज केल्यावर कळाले की, आदित्य ठाकरेंचे हे वक्तव्य एडिट केलेले आहे.
झी-24 तासच्या बातमीनुसार आदित्य ठाकरे यांनी 13 मार्च 2023 रोजी गोरेगावमधील शिवगर्जना सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत मुंबईतील रस्त्यांच्या कामात 600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'सीएम म्हणजे करप्ट माणूस' अशा शब्दांत उल्लेख केला.
खालील फोटोमध्ये आपण मूळ बातमीचा फोटो पाहू शकतात.
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाना साधत म्हणतात की, आता सीएम चा अर्थ आता बदलला आहे. ‘सीएम म्हणजे करप्ट माणूस.’ खालील व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात.
संपूर्ण भाषण येथे पाहू शकतात.
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होत की, आदित्य ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भ्रष्ट म्हणाले नव्हते. चुकीच्या दाव्यासह बनावट स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. ते एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलत होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल
Fact Check By: Sagar Rawate
Result: Altered