सत्य पडताळणी : ‘पोलीसनामा’ ऑनलाईन महाराष्ट्रात 1 नंबर

False

देशातील आणि जगभरातील बातम्या वाचकांपर्यंत पोहचवणारे वेब पोर्टल ‘पोलीसनामा’ (www.policenama.com) आता ऑनलाईन न्युज पोर्टलच्या शर्यतीत राज्यात नंबर १ वर येऊन पोहचलेले आहे, असा दावा खुद्द पोलीसनामा या संकेतस्थळानेच केला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याबाबीची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

पोलीसनामाच्या या पोस्टला 310 लाईक्स आहेत. ही पोस्ट 15 जणांनी शेअर केली आहे.

तथ्य पडताळणी

मराठीत alexa.com या संकेतस्थळाने दिलेल्या यादीनुसार पहिल्या क्रमांकावर Maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आहे. दुसऱ्या क्रमांकावर Maharashtratimes.indiatimes.com हे संकेतस्थळ आहे. यात कुठेही पोलिसनामा हे संकेतस्थळ पहिल्या काही क्रमांकात आढळलेले नाही.

आक्रार्ईव्ह लिंक

www.snaptubeapp.com या संकेतस्थळानेही मराठीतील टॉप न्यूज पोर्टलसची माहिती दिली आहे. या यादीनुसार लोकसत्ता हे पहिल्या क्रमांकाचे संकेतस्थळ आहे. महाराष्ट्र टाईम्स हे दुसऱ्या क्रमांकाचे संकेतस्थळ आहे. तिसऱ्या क्रमांकावर दिव्य मराठी हे संकेतस्थळ आहे.

आक्राईव्ह लिंक

similarweb.com या संकेतस्थळाच्या माहितीनुसार पोलीसनामाची ग्लोबल रॅकिंग 91,043 आहे. या संकेतस्थळाची भारतीय रॅकिंग 4,731 एवढी आहे. पोलीसनामाचा दावा पडताळण्यासाठी आम्ही त्याची तुलना महाराष्ट्र टाईम्सबरोबर केली तर खालील तक्ता समोर आला. या तक्त्यावरुन स्पष्ट होते की महाराष्ट्र टाईम्सची ट्रॅफिक ही पोलीसनामाच्या कितीतरी पट अधिक आहे.

अशाच रितीने lokmat.news18.com सोबत पोलीसनामाची तुलना केली असता खालील रिझल्ट आला. यातही पोलिसनामा खूपच मागे असल्याचे दिसून येत आहे.

निष्कर्ष

पोलीसनामाने रॅंकिगच्या आधारे दावा केला आहे पण similarweb.com या संकेतस्थळावर महाराष्ट्र टाईम्स आणि lokmat.news18.com या संकेतस्थळांची रॅंकिग दिसत नाही. Traffic Overview आणि Traffic Sources पाहिल्यास मात्र पोलीसनामा अन्य संकेतस्थळाच्या कितीतरी मागे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांचा हा दावा असत्य असल्याचेच स्पष्ट होते. फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत पोलीसनामाचा महाराष्ट्रात नंबर 1 असल्याचा दावा खोटा आढळला आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : ‘पोलीसनामा’ ऑनलाईन महाराष्ट्रात 1 नंबर

Fact Check By: Factcrescendo Team 

Result: False