छतावर नमाज पठणाचा हा फोटो दुबईतील आहे. भारताशी त्याचा काही संबंध नाही. वाचा सत्य

Coronavirus False

भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगवर जोर देण्यात येत आहे. परंतु, काही लोक याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात. अशा परिस्थितीत कोरोना प्रसाराला धार्मिक रंग देण्याच्या उद्देशाने एक फोटो शेयर करण्यात येत आहे. मुस्लिम समाजातील काही लोक घरांच्या छतावर एकत्र येऊन नमाज अदा करतानाचा हा फोटो भारतातील असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता हा फोटो भारतातील नसल्याचे कळाले.

काय आहे फोटोमध्ये?

facen.png

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो इजिप्त, कुवैत आणि दुबई या शहरांसह मिडल इस्ट प्रदेशातील विविध शहरांमधील असल्याचा म्हणून शेयर करण्यात आला आहे.  

Elyomnew या वेबसाईटने हा फोटो इजिप्तमधील नसल्याचे म्हटले आहे. परंतु, हा फोटो नेमका कुठला आहे ते सांगितले नाही. मग हा फोटो नेमका कुठला आहे?

ते शोधण्यासाठी मग फोटोचे बारकाईने निरीक्षण केले असता उजवीकडील वरच्या कोपऱ्यात पाणी आणि एक मिनार दिसतो. वर उल्लेख केलेल्या शहरांमध्ये अशी वास्तू आहे का हे कीवर्ड्सच्या माध्यमातून शोधले. त्यातून दुबईमध्ये अशी वास्तू असल्याचे सापडले.

अल फाहिदी ऐतिहासिक स्थळामधील अल फारूक मशिदीचा हा मिनार आहे. दुबई कॅनॉलच्या तटावर स्थिती मशिदीचा गुगल मॅप्सच्या मदतीने शोध घेतला असता खालील फोटो सापडला. 

93110482_2860602770643308_4021435878483165184_n - Copy (2).jpg

मूळ स्थळ येथे पाहा – गुगल मॅप्स

व्हायरल फोटोच्या डावीकडील वरच्या कोपऱ्यात एक पिवळसर तांबड्या रंगाची एक इमारत दिसते. गुगल मॅप्सच्या सहाय्याने आसपास शोध घेतल्यावर ती देखील सापडली. जुन्या बलादिया रस्त्यावर बेलहुल मशिदीसमोर ही इमारत आहे. गुगल स्ट्रीटच्या माध्यमातून घेतलेला स्क्रीनशॉट तुम्ही खाली पाहू शकता. दोन्हींची तुलना केल्यावर स्पष्ट दिसते खिडक्यांची रचना सारखीच आहे. 

93110482_2860602770643308_4021435878483165184_n - Copy.jpg

मूळ स्थळ येथे पाहा – गुगल मॅप्स

गुगल मॅपमधील सॅटेलाईट व्ह्युवच्या मदतीने सदरील व्हायरल फोटो नेमका कोणत्या जागेवरून घेतला असेल याचा शोध घेतला. त्यातून कळाले की, दुबईतील जुन्या डेरा सराफा बाजारातील या इमरती आहेत. खाली केलेल्या फोटोंच्या तुलनेमधून हे अधिक स्पष्ट होईल. यातून कळते की, हा फोटो दुबईतील आहे.

photo-2.png

मूळ स्थळ येथे पाहा – गुगल मॅप्स

फॅक्टली आणि ऑल्ट न्यूज यांनी या फोटोचे आधी फॅक्ट चेक केलेले आहे.

निष्कर्ष

इमारतींच्या छतावर एकत्र येऊन नमाज अदा करण्याचा हा फोटो भारतातील नाही. हा फोटो दुबईतील आहे. त्याचा भारताशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे. सदरील फोटो नेमका कधीचा आहे याविषयी ठोस माहिती मिळाली नाही. परंतु, फोटो भारतातील नाही हे स्पष्ट आहे.

Avatar

Title:छतावर नमाज पठणाचा हा फोटो दुबईतील आहे. भारताशी त्याचा काही संबंध नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False