अमित शहा यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे का? वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आल्याचे सत्य आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

amit shah corona test n.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी दैनिक दिव्य मराठीच्या संकेतस्थळाने एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना टेस्ट नकारात्मक आल्याचा दावा केला होता. परंतू गृहमंत्रालयाने अमित शाह यांची कोरोना चाचणी घेतली नसल्याचे स्पष्ट करत हा दावा फेटाळून लावला आहे. 

screenshot-divyamarathi.bhaskar.com-2020.08.14-15_35_15.png

दिव्य मराठी / संग्रहित

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली नसल्याचे वृत्त पुणे मिररने दिले असल्याचेही आपण खाली पाहू शकता. 

Amit.png

पुणे मिररचे वृत्त / संग्रहित

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत केलेले ट्विटही आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

निष्कर्ष 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी पुन्हा घेण्यात आली नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ती नकारात्मक आली असल्याचे असत्य आहे. 

Avatar

Title:अमित शहा यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False