कोलंबियातील बसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असल्याचे खोटे; वाचा सत्य

False सामाजिक

कोलंबिया (अमेरिका) येथे तेथील रस्त्यावर धावणाऱ्या शहर बससेवेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. समाजमाध्यमात व्हायरल होणारे हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Colambia Dr.Babasaheb Ambedkar.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

कोलंबिया (अमेरिका) येथे तेथील रस्त्यावर धावणाऱ्या शहर बससेवेचे हे  छायाचित्र खरे आहे का, हे जाणून घेण्यासाठी ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी commons.wikimedia.org (संग्रहित) या संकेतस्थळावर बसचे एक छायाचित्र दिसून आले. या छायाचित्राबाबत याठिकाणी देण्यात आलेल्या माहितीनुसार हे 2008 मधील छायाचित्र आहे. एड्रियन पिंगस्टोन नावाच्या छायाचित्रकाराने ते टिपले असल्याचेही याठिकाणी म्हटलेले आहे. 

TourBus.png

संग्रहित

Godfullyknown (संग्रहित) या ब्लॉगवरही हे छायाचित्र उपलब्ध असल्याचे दिसून आले. यातून हे स्पष्ट झाले की या बसच्या मुळ छायाचित्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र या बसवर नाही. या दोन्ही छायाचित्रांची तुलना खाली करण्यात आली आहे.

screenshot-online-image-comparison.com-2020.09.21-17_14_12.png

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांची पत्नी सविता आंबेडकर यांच्यासह असलेले छायाचित्र kractivist (संग्रहित), forwardpress (संग्रहित), outlookindia (संग्रहित) आदी संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. 

निष्कर्ष   

कोलंबियातील हे छायाचित्र संपादित केलेले असून मूळ छायाचित्रात बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या छायाचित्रातील बसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:कोलंबियातील बसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असल्याचे खोटे; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False