
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली. त्यानंतर अण्णांवर सोशल मीडियावर टीका होत आहे.
काहींनी तर अण्णा आणि जे. पी. नड्डा यांचा फोटो शेअर करीत दावा केला की, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा फोटो एडिटेड असून, अण्णा हजारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.
काय आहे दावा?
अण्णा हजारे यांचा फोटो शेयर करीत म्हटले की, “भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.”

तथ्य पडताळणी
या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल छायाचित्र ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मूळ फोटोला एडिट करून तयार करण्यात आले आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या 11 मार्च 2020 रोजीच्या बातमीत मूळ फोटो आढळला. सिंधिया यांनी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सिंधिया यांचा मूळ फोटो आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो यांची तुलना केल्यावर लगेच कळते की, फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे.
खाली दोन्ही फोटोंची तुलना दिलेली आहे.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, अण्णा हजारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांचा एडिट केलेला फोटो चुकीच्या माहितीसह शेअर होत आहे.

Title:अण्णा हजारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का? वाचा ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य
Fact Check By: Milina PatilResult: Altered
