तैवानने चीनचे विमान पाडले का? वाचा तैवान सरकारने केलेला खुलासा…

False आंतरराष्ट्रीय | International

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, चीनच्या सैन्यविमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यामुळे तैवानने चीनचे विमान पाडले. इतरांनी यापुढे जात म्हटले की, या घटनेत चीनेच्या एसयू-35 विमान क्षतिग्रस्त झाले असून, एक पायलट जखमी झाला असून, तैवानच्या सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीमध्ये तैवान सरकारने असे काही झाले नाही असा खुलासा केल्याचे आढळले. 

screenshot-www.facebook.com-2020.09.05-18_19_49.png

फेसबुक पोस्ट ।  संग्रहित 

तथ्य पडताळणी

तैवानने खरंच चीनचे विमान पाडले का याचा शोध घेतला असता तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केलेला खुलासा आढळला. त्यामध्ये स्पष्ट म्हटले की, सदरील दावा असत्य आहे. “तैवानने चीनचे एसयू-35 विमान पाडले,’ असे इंटरनेटवर जे दावे केले जात आहेत ते पूर्णतः चूक आणि निराधार आहेत. नागरिकांमध्ये मुद्दामहून संभ्रम निर्माण करण्याचा हा खोडसाळ प्रयत्न असून तैवान हवाई दल याचा निषेध करते,” असे तैवानच्या संरक्षण दलाच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.

screenshot-www.mnd.gov.tw-2020.09.05-18_51_08.png

तैवान संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ / संग्रहित

यानंतर आम्ही फॅक्ट क्रेसेंडोप्रमाणे तैवानमध्ये आयएफसीएन पार्टनर असणाऱ्या TFC-Taiwan या फॅक्ट चेकिंग वेबसाईटशी संपर्क साधला. त्यांनीदेखील यासंदर्भात पडताळणी केली आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणतीही खात्री न करता याबाबतचे वृत्त त्यांनी दिले आहे. विमान पाडल्याचा पुरावा म्हणून समाजमाध्यमात पसरत असलेले एक छायाचित्र अन्य एका जुन्या घटनेचे असल्याचेही यात म्हटले आहे.

screenshot-tfc-taiwan.org.tw-2020.09.05-19_12_34.png

tfc-taiwan.org ।  संग्रहित

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. तैवानने चीनचे विमान पाडले नसल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. हे ट्विट आपण खाली पाहू शकता.

संग्रहित 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, तैवानने चीनचे विमान पाडले, हा दावा असत्य असल्याचे खुद्द तैवान सरकारने जाहीर केले आहे. अशी काही घटना घडल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे.

Avatar

Title:तैवानने चीनचे विमान पाडले का? वाचा तैवान सरकारने केलेला खुलासा…

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False