
ब्राम्हण हे ऑस्ट्रेलियात गायी आणि बैलाचे मांस विकतात व खातात, असा दावा करत हेमंत बागल यांनी एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायी आणि बैलाचे मांस विकतात का, या माहितीची तथ्य प़डताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला असल्याचे आम्हाला दिसून आले. या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला आहे की, ऑस्ट्रेलियात ब्राह्मण गाईचे मांस म्हणजेच बीफची विक्री करीत आहेत. तसेच त्या कंपनीचे ‘Brahman Pies’ असे नाव आहे.
तथ्य पडताळणी
ब्राम्हण हे ऑस्ट्रेलियात गायी आणि बैलाचे मांस विकता व खातात का हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम brahmanpies या कंपनीच्या संकेतस्थळास भेट दिली. ही एक खासगी कंपनी असल्याचे या ठिकाणी म्हटले असल्याचे आम्हाला दिसून आले. त्यानंतर आम्ही कंपनीच्या फेसबुक पेजला भेट दिली. या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2020 रोजी एक पोस्ट केल्याचे दिसून आले. या पोस्टमध्ये आपण भारतीय कंपनी नसून आमचा ब्राह्मणांशी काहीही संबंध नाही (वेगळ्या शब्दात लिहिलेली भारतीय जात), असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या ब्राह्मण वंशाच्या गुरांवरुन कंपनीचे हे नाव ठेवण्यात आल्याचे कंपनीने म्हटलंय. व्हिडिओ पब्लिश करणाऱ्या व्यक्तीने किंवा त्यांच्या सहकाऱ्याने आमच्या कंपनीकडे किंवा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत कोणीही संपर्क साधला नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
Brahman Pies कंपनीची फेसबुकवरील मुळ पोस्ट
त्यानंतर ब्राम्हण गोवंश (संग्रहण) विषयक माहितीही वेगवेगळ्या संकेतस्थळांवर (संग्रहण) उपलब्ध असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस खातात का याविषयी कोणतीही ठोस माहिती मात्र मिऴाली नाही.
निष्कर्ष
ज्या कंपनीच्या नावाने ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस विकतात, असा दावा करण्यात येत आहे, त्या कंपनीने याचा इन्कार केला आहे. ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस खातात का याविषयी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळली आहे.

Title:ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस विकतात का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Partly False
