पश्चिम बंगालमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या या गरीब विद्यार्थ्याच्या व्हायरल पोस्टमागील सत्य काय? वाचा –

False सामाजिक

पश्चिम बंगालमधील संजय रविदास नावाच्या एका गरीब विद्यार्थ्याने जिद्दीने अभ्यास करीत दहावीत पहिला क्रमांक पटकावला, अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. वडील नसताना आई आणि बहिणीचा सांभाळ करत त्याने 93 टक्के गुण मिळवले, अशा दाव्यासह त्याचा फोटो शेयर केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, ही बातमी 2018 मधील असून त्याला तेव्हा 66 टक्के मिळाले होते.

काय आहे पोस्टमध्ये?

screenshot-www.facebook.com-2020.07.20-17_32_24.png

फेसबुक पोस्टसंग्रहित

तथ्य पडताळणी

पश्चिम बंगालमधील दहावीच्या परीक्षेत कोण प्रथम आले, याचा शोध घेतला. त्यावेळी आनंद बझार पत्रिका या स्थानिक दैनिकाच्या संकेतस्थळावरील वृत्त दिसून आले. अरित्रा पाल या परीक्षेत प्रथम आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

screenshot-www.anandabazar.com-2020.07.20-18_30_44.png

आनंद बझार पत्रिकासंग्रहित

संजय रविदास याचा हा निकाल कधीचा आहे आणि त्याला किती गुण मिळालेत हे त्याच्या निकालाच्या प्रतीवर पाहिले त्यावेळी हा निकाल 2018 मधील असल्याचे आणि त्याला 66.42 टक्के एवढेच गुण पडले असल्याचे दिसून आले. त्याचे हे निकालपत्र आपण खाली पाहू शकता.

image1.jpg

त्यानंतर प्रभात खबर या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर 12 जून 2018 रोजी प्रसिद्ध झालेले एक वृत्तही दिसून आले. या वृत्तानुसार संजयने प्रतिकुल परिस्थितीत प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. संजय राज्यात प्रथम आल्याचा उल्लेख या वृत्तात कोठेही दिसून येत नाही.

screenshot-www.prabhatkhabar.com-2020.07.20-19_01_06.png

प्रभात खबर / संग्रहित

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट होते की, संजय रविदास हा 2018 मध्ये प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाला होता. तो राज्यात पहिला आला नव्हता. त्याला 93 टक्के नव्हे तर 66 टक्के गुण प्राप्त झाले होते. त्यामुळे तो परीक्षेत 93 टक्के गुणांसह पश्चिम बंगाला राज्यात प्रथम आल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:पश्चिम बंगालमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या या गरीब विद्यार्थ्याच्या व्हायरल पोस्टमागील सत्य काय? वाचा –

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False