पाणी साचलेल्या विमानतळाचा व्हिडिओ हैदराबादचा नाही; वाचा सत्य

False सामाजिक

हैदराबाद शहरातील जनजीवन मुसळधार पावसाने मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरसुद्धा पावसाचे पाणी साचले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. तो व्हायरल व्हिडिओ मेक्सिको देशातील आहे.

काय आहे दावा?

पोस्टमधील व्हिडियोत विमानतळावर गुडघ्या इतके पाणी साचल्याचे दिसते. सर्व विमाने पाण्यात उभी आहेत. हा व्हिडियो शमशाबाद विमानतळ हैद्राबाद येथील असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Facebook Post | Archive

तथ्य पडताळणी

हैदराबाद विमानतळावर खरोखरच असे पाणी साचले आहे का, याचा शोध घेण्यासाठी शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्विटर खात्यास भेट दिली. त्यावेळी 15 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आलेले एक ट्विट दिसून आले. 

या ट्विटनुसार हैदराबाद विमानतळातील सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू आहेत. विमानतळावर पाणी साचल्याचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे हैदराबाद विमानतळावरील नसल्याचे त्यात म्हटले आहे. 

Archive

मग हा व्हिडियो नेमका कुठला आहे? 

सदरील व्हिडिओ 30 ऑगस्ट 2017 रोजीपासून युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीनुसार तो मेक्सिको सिटीमधील विमानतळावरील आहे. 

Archive

विविध वृत्तवाहिन्यांनी ट्विटरवर 2017 साली हा व्हिडिओ शेयर केला होता. ‘न्यूज वीक’ वेबसाईटने ट्विट करून म्हटले होते की, पाणी साचल्यामुळे मेक्सिको सिटी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले होते.  

Archive

Aviacionaldia या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार मेक्सिकोतील 300 उड्डाणे त्यावेळी रद्द करण्यात आली होती. 

निष्कर्ष 

यावरून हे स्पष्ट होते की, विमानतळावर पाणी साचल्याचा हा व्हिडिओ हैदराबाद येथील विमानतळावरील नाही. तो व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा मेक्सिको विमानतळावरील आहे.

Avatar

Title:पाणी साचलेल्या विमानतळाचा व्हिडिओ हैदराबादचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False